Warning to protest if water is released from Sina Kolgaon Dam under the name of Ashadhi VariWarning to protest if water is released from Sina Kolgaon Dam under the name of Ashadhi Vari

करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील सीना कोळगाव धरणातून आषाढी वारीच्या नावाखाली पाणी सोडल्यास तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा सीना कोळगाव धरणग्रस्त संघटनाचे अध्यक्ष सतीश नीळ यांनी दिला आहे.

नीळ यांनी म्हटले आहे की, सीना कोळगाव प्रकल्पामध्ये सध्या अत्यल्प पाणी साठा आहे. पाणी पातळी डेडस्टॉकमध्ये आहे. आम्ही धरणग्रस्त बांधवांनी आमची घरे, दारे जमीन जुमला सर्व काही धरणासाठी देऊन आम्ही धरणग्रस्त बांधवांनी त्याग केला आहे. यावर्षी अजून ही पाऊस पडला नाही म्हणून आमची उभी पिके अगोदरच जळून गेली आहेत. पाणी पातळी खाली गेल्यामुळे आम्हाला वारंवार केबल, पाईप, सातत्याने वाढवावे लागेल आहेत. तोच खर्च आम्हाला न झेपणारा झालेला आहे.

करमाळा तालुक्यातील मिरगव्हाण, हिवरे, हिसरे, कोळगाव, निमगाव (ह) आवाटी व परंडा तालुक्यातील डोंजा, कौडगाव व परिसरातील सर्व शेतकरी अगोदरच मेटाकुटीला आला आहे. आपण आमचा अंत पाहू नये.व विनाकारण कोणी तरी वारीच्या नावाखाली पाणी मागत असेल तर ते आम्ही धरणग्रस्त शेतकरी सहन करणार नाही. कृपया आपण पाणी सोडल्यास धरणग्रस्त संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन केले जाईल, असे ते म्हणाले आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *