करमाळा (अशोक मुरूमकर) : पुर्वभागातील हिसरे, हिवरे, कोळगाव रस्त्यांच्या कामांसाठी व पुलाची उंची वाढवण्यासाठी युवासेनेकडुन अनेक वर्षापासून सातत्याने अंदोलने केल्याने प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेअंतर्गत दोन वर्षापुर्वी रस्ता दुरस्तीची मंजुरी मिळाली. मात्र संबंधित ठेकेदार कंपनीकडून दिरंगाईने काम सुरू आहे. यावर प्रशासनाकडून काहीच कारवाई होत नसल्याने युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी प्रशासनाचा तिव्र शब्दात निषेध व्यक्त केला आहे.

या पुलाचे काम तात्काळ सुरू करावे यासाठी पाठपुरवा केल्यानंतर स्थानिक नागरिकांकडून उंची वाढवण्यासाठी काम अडवले असल्याचे ठेकेदाराकडून सांगण्यात येते. मागील पावसातील अनुभव भविष्यातील धोका ओळखून प्रशासनाने स्थानिक नागरिक व ठेकेदार यांच्यात समन्वयक साधून पावसाळ्यापुर्वी पुलाचे काम पुर्ण करणे गरजचे होते. मात्र प्रशासन व ठेकेदार यांनी युवासेनेकडुन अनेकवेळा केलेली अंदोलने याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले. तसेच हिवरे, हिसरे, कोळगाव, निमगाव गौंडरे या गावातील नागरिकांकडून देखील मागणीचे गांभीर्य ओळखून तिव्र विरोध न झाल्याने आज पुन्हा एकदा हा पुल पाणयाखाली गेल्याने शाळांना, सुट्टी घ्यावी लागली,वाहतुकीचा खोळंबा झाला किमान दोन दिवस हे सुरळती होईल का नाही याची शाश्वती नाही.
निधी मंजुर असताना पुलाचे काम रखडवल्याने प्रशासन व ठेकेदार यांचा युवासेनेकडुन तिव्र निषेध व्यक्त असून पाऊस उघडल्यानंतर या मागणी फिसरे येथे रस्ता रोको आंदोलन करणार असून जोपर्यंत मंजुर असलेल्या पुलाच्या कामास सुरवात होत नाही तोपर्यंत रस्त्यावर उठणार नाही असा इशारा युवासेना तालुकाप्रमुख शंभूराजे फरतडे यांनी दिला आहे.