पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे माजी सहकार्यवाह व राष्ट्रीय प्रभारी करमाळा तालुक्याचे सुपुत्र मदनदासजी देवी यांचे दुः खद निधन झाले आहे. आज (मंगळवारी) त्यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी पुणे येथील मोती बागेमध्ये ठेवण्यात आले आहे. यावेळी भाजपसह अनेक कार्यकर्त्यांनी त्यांना आदरांजली अर्पण केली.
![](https://kaysangtaa.com/wp-content/uploads/2023/07/madndas-devi-1024x706.jpg)
भाजपचे नेते केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, मंत्री प्रकाश जावडेकर असे अनेक वरीष्ठ पदाधिकारी व नेते यावेळी उपस्थित होते. करमाळा येथील भाजपचे शहराध्यक्ष जगदीश आगरवाल यांच्यासह राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे व भाजपाचे अनेक पदाधिकारी येथे उपस्थित आहेत.
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2023/07/Mane-1-1024x683.jpg)
![](http://kaysangtaa.com/wp-content/uploads/2023/07/e6873a22-9402-40d9-8213-93236847218f-1024x1024.jpg)