कमलाभवानी साखर कारखान्याचा बॉयलर प्रदीपन सोहळा संपन्न

करमाळा (सोलापूर) : कमलाभवानी साखर कारखानाचा दहावा बॉयलर अग्नी प्रदीपन सोहळा विठ्ठलराव शिंदे सहकारी साखर कारखान्याचे उपाध्यक्ष वामन उबाळे यांच्या हस्ते झाला. यावेळी ऊस गाळपाचे पैसे लवकरात लवकर दिले जाईल, असे आश्वासन देण्यात आले. याबरोबर पूर भागातील ऊस खरडून वाहून गेलेले आहेत अशा ठिकाणी ऊसतोडीला प्राधान्य देण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. माजी आमदार बबनदादा शिंदे व आम्ही या कारखान्याच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कमलाभवानी साखर कारखान्याचे अध्यक्ष विक्रमसिंह शिंदे म्हणाले, ‘गेल्यावर्षी गाळप हंगाम बंद होता. तरीही सर्व कर्मचाऱ्यांची पगार वाढ केली आहे. वाहन मालकांचे उर्वरित हप्ता लवकरच सोडणार’ असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड यांनी शेतकऱ्यांना कमलाभवानी साखर कारखान्याला ऊस पुरवठा करण्याचे आवाहन केले. सरपंच रवींद्र वळेकर, चंद्रहास निमगिरे, माणिक पाटील, राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष भरत अवताडे, डॉ. गोरख गुळवे, नानासाहेब निळ, तात्या सरडे, सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल, शहाजी झिंजाडे, डॉ. सुभाष शेंद्रे, शशिकांत सरडे, समाधान भोगे, शंकर जाधव, तुकाराम क्षिरसागर, तात्या पाटील, बाप्पा चव्हाण, गोरख मस्के, संग्राम मस्के, अरविंद चौधरी, रामचंद्र क्षिरसागर, समाधान गायकवाड, आनंदराव उबाळे, विनोद जाधव, शांताराम जगदाळे, समाधान पाटील, रामहरी जगताप, सुजित शिंदे, शिवाजी अनारसे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *