Yuva Sena will protest in Karmala tomorrow to demand that action be taken against those who cheat sugar cane transportersShanbhuraj fartade

करमाळा (सोलापूर) : उस वाहतूकदारांची कोट्यवधींची फसवणूक करणाऱ्या मुकादमावर गुन्हे दाखल करून उस वाहतूकदारांचे पैसे मिळवून द्यावेत, या मागणीसाठी युवासेना (ठाकरे गटाकडून) सोमवारी (ता. ४) पोलिस ठाण्यासमोर घंटानाद आंदोलन केले जाणार आहे, अशी माहिती युवासेना तालुका युवा अधिकारी शंभूराजे फरतडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिला आहे.

फरतडे यांनी म्हटले आहे की, करमाळा तालुक्यासह इतर साखर कारखान्यांना उस पुरवठा करणाऱ्या उस वाहतूकदारांची पुसद, जिंतुर, परभणी, हिंगोली, जालना, बीड, परळी, गेवराई या भागातील मुकादमांनी उसतोड मजूर देतो म्हणून कोट्यावधीची फसवणूक केली आहे. सदर उस वाहतूक करणाऱ्या अनेक सुशिक्षित बेरोजगार शेतकरी मुलांनी उसनवारी, व्याजबट्टा तसेच बॅंक कर्ज करून वाहने व टोळ्या करण्यासाठी पैसे गुंतवले आहेत.

फसवणूकीमुळे त्यांच्यावर आत्महत्येची वेळ आली आहे. या वाहतूकदारांकडे मुकादम तसेच उसतोड मजुरांची नोट्री, चेक आधार कार्ड, पैसे देतानाचे व्हिडीओ तसेच बॅंक खात्याचे तपशील उपलब्ध आहेत. मात्र पोलिस प्रशासनाकडून योग्य पद्धतीने सहकार्य होत नसल्याचा आरोप फडतरे यांनी केला आहे. एखादा मुकादम किंवा मजूर यास धरून आणले तर आपल्याच लोकांवर अपहरण, ओलीस ठेवणे अशा प्रकारचे गंभीर गुन्हे दाखल होत आहेत हे दुर्दैव आहे. त्यामुळे अशा गुन्ह्यात विशेष पथक तयार करून उस वाहतूक करणाऱ्यांना अभय दिले जावे, त्यांची झालेली फसवणूक व नुकसानभरपाई मिळवून देण्यासाठी प्रभावी प्रयत्न केले जावेत या मागणीसाठी उस वाहतूकदार, वाहन मालक यांना सोबत घेऊन तहसील कार्यालयासमोर घंटानाद आंदोलन करण्यात येणार आहे त्यांनी सांगितले आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *