संगोबा येथे मंचरी ग्रंथाचे पारायण सोहळा व त्रिदिनिय कीर्तन महोत्सव संपन्न

करमाळा (सोलापूर) : संगोबा येथील श्री आदिनाथ मंदिरात आप्पासाहेब वासकर महाराज पंढरपूर यांच्या फडातर्फे मंचरी ग्रंथाचे पारायण सोहळा व त्रिदिनिय कीर्तन महोत्सव झाला. यामध्ये पहिल्या दिवशी हभप हरिदास गुंडगिरे महाराज यांचे कीर्तन झाले. दुसऱ्या दिवशी हभप नामदेव महाराज वासकर यांचे कीर्तन झाले. काल्याचे किर्तन हभप विठ्ठल पाटील शेटफळकर यांचे किर्तन झाले. यावेळी श्री गुरु राणोजी महाराज वासकर पंढरपूरकर यांचे मार्गदर्शन झाले. दरम्यान मंदिर परिसरामध्ये वासकर महाराज यांच्या हस्ते वृक्षरोपण करण्यात आले. हभप विठ्ठल पाटील, हभप संजय उर्फ बप्पा गायकवाड, मगन महाराज पोळ, प्रा. शशिकांत नरुटे, हभप अण्णासाहेब सुपनवर, हभप राजेंद्र रोंगे महाराज, बापूराव नाईकनवरे, संतोष महाराज शिंदे, संभाजी डवले, भागवत शेळके, नवनाथ दुधे महाराज, भगवान पाटील, धनंजय नरुटे, सोमनाथ लांडगे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *