Viral : सवितादेवी राजेभोसले यांना पोंधवडीतील बिभिषण हुलगे यांचे प्रश्न

आदरणीय सवितादेवी राजेभोसले वहिनीसाहेब लहान तोंडी मोठा घास घेत आहेत. पण आता बोलायलाच लागेल तुम्ही कोणाला पाठिंबा द्यायचा हा सर्वस्वी निर्णय तुमचा आहे. पण जे तुमचे राजकारण संपवण्याची भाषा करत होते. ज्यांनी प्रत्येक सभेत तुमच्याविषयी अगदी खालच्या पातळीवर टीका केली. अशा व्यक्तीला तुम्ही साथ देताल अस कधी वाटले नव्हते. जे ओरडून सांगत होते ज्यांना काम करण्याची काहीच माहिती नाही, त्यांना प्रशासनातल काय कळत नाही आशा टीका करणाऱ्यांच्या मांडीला- मांडी लाऊन बसतील हा कधी विचार केला नव्हता. वहिनीसाहेब तुमच्यासोबत काही गावांमध्ये उभा राहायला पण कार्यकर्ते नव्हते. आम्ही नारायणआबा पाटील गटाच्या माध्यमातून तुम्हाला लीड देण्याचे काम केले होते. हे तुम्ही लवकरच विसराला!

विशेष म्हणजे पोंधवडी गावामधून तुमच्याकडे जे काही पाठपुरावे केले त्यापैकी तुम्ही किती कामे केली व जिल्हा परिषदच्या माध्यमातून तुम्ही आमच्या गावासाठी काय केले? एक उत्तर असेल तुमच्याकडे तर सांगा. आज तुमच्यावर फॉर्म काढून घेण्याची वेळ येऊन ज्यांनी तुमचं उन- धून भर सभेत काढलं त्यांना पाठींबा तुम्हाला द्यावा लागला. इतकी वाईट वेळ येईल व ती का आली यावर आत्मपरीक्षण करावे. आवर्जून मला कोर्टी गटामध्ये तुम्ही केलेल्या कामाची लिस्ट करून पाठवा मी स्वतः तुमचा आमच्या पोंधवडी ग्रामपंचायतच्या वतीने सत्कार करतो. प्रत्येकवेळी आपण फक्त कोरोना आजाराच्या नावाखाली लपण्याचे काम केले विकास राहिला बाजूला तरी पण वहिनीसाहेब आम्ही तुमच्या मागे उभे होतो.

विकासकामे करावीत ती आणि फक्त आबांनीच.. प्रत्येक आमदारकीच्यावेळी तुम्हांला आमदार झाल्यासारखी स्वप्न पडत होते तुम्हांला तुमचा मुलगा गावामध्ये निवडून आणता नाही आला. तुम्ही बाकीच्या गावामध्ये काय विकास करणार? यावर आत्मचिंतन करण्याची गरज आहे.

  • बिभिषण हुलगे,
    पोंधवडी, ग्रामपंचायत सदस्य

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *