करमाळा (सोलापूर) : केम गणातून पंचायत समितीच्या निवडणुकीत उतरलेले राष्ट्रवादीचे (शरद पवार गट) उमेदवार अमरजित साळुंके यांनी विजयी करण्याचे आवाहन खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी केले आहे.
केम गणात साळुंके यांच्या प्रचारार्थ खासदार मोहिते पाटील यांनी नुकताच कंदर व केम दौरा करून कॉर्नर सभा घेतल्या. यावेळी त्यांनी केम गणाच्या विकासासाठी सुसंगत, पारदर्शक व लोकाभिमुख नेतृत्वाची गरज अधोरेखित केली. खासदार मोहिते पाटील म्हणाले, ‘केम गणाच्या सर्वांगीण विकासासाठी सक्षम, अभ्यासू आणि नागरिकांशी नाळ जोडणारे नेतृत्व आवश्यक आहे. साळुंके हे असेच नेतृत्व असून केम गणाच्या विकासासाठी त्यांना भरघोस मतांनी विजयी करण्याचे त्यांनी आवाहन केले.
पुढे बोलताना ते म्हणाले, ‘जे आता आमच्यापासून बाजूला झाले, त्यांना पुन्हा ‘शिवरत्न’वर स्थान नाही. विश्वासघातकी राजकारण चालणार नसल्याचा इशारा त्यांनी दिला. कॉर्नर सभांना कार्यकर्ते व मतदार उस्फूर्तपणे उपस्थित होते. मोहिते पाटील यांच्या सभेनंतर मतदारांना आत्मविश्वास मिळाला असून केम गणात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची बाजू अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.
मोहिते पाटील यांनी व्यापारी पेठेतील काही प्रमुख ठिकाणी भेट दिली. यावेळी जिल्हा परिषदचे माजी अध्यक्ष अनिरुद्ध कांबळे, आदिनाथचे उपाध्यक्ष महेंद्र पाटील, डॉ. अमोल घाडगे, दादासाहेब पारखे, माजी सरपंच आजिनाथ शिंदे, काका पारखे, गोपाळदादा मंगवडे, नवनाथ डोके, रावसाहेब जाधव, पोपट साळुंके, हरिभाऊ गरड, शिवसेनेच्या (ठाकरे) वर्षाताई चव्हाण, प्रशांत वासकर, सावंत गुरुजी, किरण गोरख तळेकर, हरिभाऊ मंगवडे, अरुण यादव, लियाकत भाई, अकलाख जहागीरदार, सुभाष मंगवडे, वसंत साळुंके, दिलदार मुलानी, अरुण पवार, सर्जेराव फरतडे, सुनील पवार, ॲड. प्रशांत बागल, बाळासाहेब फरतडे, ज्ञानेश्वर पवार, रणजीत पवार, नागनाथ गाडे, राहुल पवार, अशोक मुटेकर, पिंटू भगत, रामेश्वर मेटे, मोहन गाडे, दारासिंग गाडे, विशाल गाडे आदी उपस्थित होते.
