मुंबई : पावसाळी अधिवेशनाचा आज (सोमवार) पहिलाच दिवस आहे. मात्र पहिल्याच दिवशी विरोधकांनी आक्रमक भूमिका घेतली आहे. त्यानंतर विधानसभेचे कामकाज दिवसभरासाठी तहकूब करण्यात आले आहे.
पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी विरोधक शेतकऱ्यांच्या प्रश्नावर आक्रमक झाले आहेत. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, सरकार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर गंभीर आहे. सरकारलाही शेतकऱ्यांची काळजी आहे. दुबार पेरणीची वेळ आली तर सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी उभे आहे. विरोधी गटाचे आदित्य ठाकरे यांनी जोरदार घोषणाबाजी करत विरोधकांवर निशाणा साधला. त्यानंतर ठाकरे गटाने बंड केलेल्या आमदारांना अपात्र करण्याचे पत्रही देण्यात आले आहे.
विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांनी आक्रमक घेतली. यामध्ये राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाचे आमदारही उपस्थित होते. दरम्यान अजित पवार गटाच्या आमदार व मंत्र्यांनीही यावेळी जोरदार शक्तिप्रदर्शन केले. आज विरोधी पक्षाचे नाव निच्शित होईल, अशी शक्यता होती. मात्र अजूनही विरोधी पक्षाचे नाव निश्चित झालेले नाही. शिंदे गटात प्रवेश केलेल्या नीलम गोऱ्हे, मनीषा कायंदे आदींना अपात्र करण्याचे पत्र यावेळी देण्यात आले आहे.