केम येथे जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीच्या तीन उमेदवारांमध्ये चुरशीची लढत

करमाळा : तालुक्यातील केम पंचायत समिती गणामध्ये सुरुवातीला भाजपविरुद्ध विकास आघाडी अशी सरळ वाटणारी लढत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष अमरजित साळुंके यांच्या उमेदवारीमुळे चुरशीची बनली.

केम येथे मोहिते पाटील समर्थक अजित तळेकर यांनी बंडखोरी करून ऐनवेळी आमदार पाटील गटामधून जिल्हा परिषदची उमेदवारी घेऊन मोहिते पाटील गटाला जोरदार धक्का दिला होता. तरीदेखील अमरजित साळुंके यांनी कुठल्याही स्थानिक नेत्यांची साथ नसताना लढण्याचा निर्धार करून केम पंचायत समिती गणामध्ये त्यांची स्वतःची उमेदवारी कायम केली. अचानक उभ्या ठाकलेल्या अशा बिकट परिस्थितीत कार्यकर्त्यांना साथ देऊन त्यांचे मनोबल वाढवण्याचे कार्य खासदर धैर्यशील मोहिते पाटील व मोहिते पाटील परिवाराच्या केम व कंदर येथील दौऱ्याने केले. या सर्व घडामोडींचा परिणाम म्हणून केम पंचायत समिती सोबतच जिल्हा परिषद चे उमेदवारांमध्ये देखील चुरस निर्माण झाल्याचे दिसत आहे.

केम जिल्हा परिषद गटासाठी कोणताही उमेदवार सोबत नसताना देखील अमरजित साळुंके यांनी केम पंचायत समिती गणात दिलेली लढत ही भविष्यातील केम गटाच्या व तालुक्याच्या राजकारणावर नक्कीच दूरगामी परिणाम करणारी ठरणार आहे, अशी करमाळा तालुक्यात व केम परिसरात चर्चा आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *