करमाळा (सोलापूर) : केम येथे महाशिवरात्री यात्रा उत्सव व श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवानिमित्त १७ ते २० फेब्रुवारी दरम्यान चार दिवसीय कृषी प्रदर्शन होणार आहे. मंगळवारी (ता. १७) या कृषी प्रदर्शनचे उदघाटन होणार आहे, अशी माहिती श्री उत्तरेश्वर देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष नवनाथ खानट यांनी दिली आहे. यामध्ये कृषी उत्पादनाचे २०१ स्टॊल असणार आहेत. याशिवाय तज्ञांची पीक विषयक चर्चासत्र व गृहउपयोगी वस्तूंचे स्वतंत्र दालन असणार आहे. श्री उत्तरेश्वर देवस्थान मैदान येथे हे कृषी प्रदर्शन होणार आहे.
केम येथे मंगळवारपासून चार दिवसीय कृषी प्रदर्शन
