करमाळा (सोलापूर) : राष्ट्रवादीचे नेते अजित पवार हे सरकारमध्ये सहभागी झाल्याने अनेक कामे मार्गी लागत आहेत, असा विश्वास आमदार संजयमामा शिंदे गटातील कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. त्यातच आता आणखी ५० कोटींची विकास कामे मार्गी लागणार असल्याचे सांगितले जात आहे. पावसाळी अधिवेशनात करमाळा मतदार संघातील कामे करून घेण्याचा आमदार शिंदे यांचा प्रयत्न आहे.
पावसाळी अधिवेशनात आमदार शिंदे यांनी २५ कोटींच्या कामाची यादी सादर केली आहे. त्यानंतर पहिली सुचवलेली कामे आणि आताची काही कामे होतील, असे सांगितले जात असतानाच करमाळा शहरातील रस्ते व तालुक्यातील कामे होणार आहेत. २५१५ व ठोक अनुदान यामधून ही कामे होणार आहेत. २५ कोटींच्या कामाची यादी ही अर्थसंकल्पात मंजुरीसाठी गेलेली आहे. मात्र २५१५ व ठोक अनुदान यातील होणारी कामे मार्गी लागतील, असे सांगितले जात आहे.
पावसाळी अधिवेशनात आणखी करमाळा तालुक्याला काय मिळणार हे पहावे लागणार आहे. तालुक्यासाठी जास्तीत जास्त निधी मिळावा व तालुक्यातील विकास कामे मार्गी लागावीत म्हणून आमदार शिंदे यांचे प्रयत्न आहेत. अजित पवार हे उपमुख्यमंत्री झाल्याने अनेक कामे होतील, असे सांगितले जात आहे. आमदार शिंदे हे सुरुवातीपासून अजित पवार यांना नेते मानतात. त्यामुळे त्यांच्याकडून निधी मिळेल, असे बोलले जात आहे.