If you don listen to us we will all kill you and throw you in the fire threatening the widowIf you don listen to us we will all kill you and throw you in the fire threatening the widow

करमाळा (सोलापूर) : आमचे ऐकले नाही तर आम्ही सर्वजण मिळून तुला ठार मारून उजनीत टाकू, अशी धमकी देऊन शिवीगाळ करत मारहाण करून ३७ वर्षाच्या विधवेचा शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार करमाळा तालुक्यातील सोगाव येथे घडला आहे. या प्रकरणात सासू, दीर, जाऊ, नणंद व तिच्या मुलाविरुद्ध करमाळा पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे.

फिर्यादीने म्हटले आहे की, 2021 मध्ये पतीचे निधन झाले. त्यानंतर मुलासह मी सोगाव येथे राहते. गुन्हा दाखल झालेले संशयित मला किरकोळकरणावरून त्रास देत. पतीचे निधन झाल्याने त्यांचा त्रास मी सहन करत होते. ते सतत घालून- पाडून बोलत. पतीचे वर्षश्राद्ध झाल्यानंतर त्यांनी मला ‘जमीन वाटून मिळणार नाही, आम्ही सांगेल तसेच ऐकायचे नाहीतर निघून जा,’ असे म्हणून शारीरिक व मानसिक छळ केला. ‘तुझ्या जमिनीतील निघालेले उत्पन्न आम्हाला दे’, असे ते म्हणत होते. ‘मी कष्ट करून माझ्या शेतातील उत्पन्न घेत आहे. मी तुम्हाला देणार नाही,’ असे म्हणल्यानंतर त्यांनी फिर्यादीला मारहाण केली. शिवीगाळ करून त्यांनी धमकी दिली आहे. ‘आमचे ऐकले नाही तर आम्ही सर्वजण मिळून तुला जीव ठार मारून उजनी धरणात टाकून देऊ’ अशी नेमके दिली. त्यानंतर फिर्यादीने तक्रार दिली. त्यावरून हा गुन्हा दाखल झाला आहे.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *