करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील रोशेवाडी येथील एका डीपीचे १९० लिटर ऑईल व कॉईल चोरीला गेले आहे. यामध्ये महावितरणचे करमाळा ग्रामीण २ चे प्रधान तंत्रज्ञन सोमनाथ दुधे यांनी फिर्याद दिली आहे. त्यावरून एका अनोखी चोरट्याविरुद्ध करमाळा पोलिसात भारतीय विद्युत अधिनियम (सुधारणा) २००३ च्या कलम १३६ नुसार गुन्हा दाखल झाला आहे.
रोशेवाडीतील लोंढे- मुसळे वस्ती येथील डीपी बंद पडला होता. त्यामुळे तेथील नागरिकांना वीज मिळत नसल्याची तक्रार आली. त्यावरून कर्मचारी डीपी दुरुस्तीसाठी तेथे गेले तेव्हा सदर डीपी खाली पडलेला दिसला. त्यात पाहाणी केली तेव्हा त्यातील ऑईल व क्वॉईल नसल्याचे दिसले. १९० लिटर ऑईलची किंमत १५ हजार २०० रुपये तर क्वॉईलची किंमत १० हजार रुपये असा २५ हजार २०० रुपयांचा ऐवज चोरटयांनी लंपास केला आहे.