करमाळा (अशोक मुरूमकर) : राज्य सरकारकडून कृषी क्षेत्रात देण्यात येणार ‘उद्यानपंडीत’ पुरस्कार कामोणे येथील बाळासाहेब काळे यांना जाहीर झाला आहे. सरकारचे उपसचिव संतोष कराड यांनी या पुरस्काराची घोषणा केली असून काळे यांचे अभिनंदन केले जात आहे.

राज्यात कृषी व कृषी संलग्न क्षेत्र तसेच फलोत्पादन क्षेत्रात उल्लेखनीय काम करणाऱ्या व्यक्ती व संस्थाना पुरस्कार दिला जातो. ‘डॉ. पंजाबराव देशमुख कृषीरत्न’, ‘वसंतराव नाईक कृषिभूषण’, जिजामाता कृषिभूषण’, ‘कृषिभूषण’ (सेंद्रिय शेती), ‘वसंतराव नाईक शेती मित्र’, ‘युवा शेतकरी’, ‘उद्यान पंडित’, ‘वसंतराव नाईक शेतीनिष्ठ शेतकरी’, ‘पदमश्री डॉ. विठ्ठलराव विखे पाटील कृषिसेवा’, असे वेगवेगळे पुरस्कार दिले जातात. त्यामध्ये पुणे विभागातील ‘उद्यानपंडीत’ पुरस्कार करमाळा तालुक्यातील कामोणे येथील काळे यांना जाहीर झाला आहे.
