करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बिटरगाव (श्री) येथील पांडुरंग घोडके (वय ६७) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले आहे. सोमवारी (ता. २४) पहाटे ४ वाजताच्या सुमारास त्यांचे निधन झाले असून बिटरगाव येथे त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी गावातील सर्व क्षेत्रातील व्यक्ती उपस्थित होत्या. त्यांच्या पश्चात तीन मुलं, पत्नी, सुना, नातवंडे, भाऊ व भावजई असा परिवार आहे. बिटरगाव श्री येथील सामाजिक कार्यकर्ते प्रवीण घोडके यांचे ते वडील होते.

