करमाळा (सोलापूर) : तेलंगाणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी तेलंगणातील शेतकऱ्यांची 19 हजार कोटीची कर्ज माफी केली आहे. त्याचा करमाळा शहरात सुभाष चौक येथे आनंद उत्सव साजरा करण्यात आला. करमाळा तालुका भारत राष्ट्र समितीचे समन्वयक अण्णासाहेब सुपनवर यांच्या नेतृत्वाखाली हा आनंदोत्सव साजरा करण्यात आला. यावेळी भारत राष्ट्र समितीचे ओबीसी विभागाचे समन्वयक शिवाजीराव बनकर, भारत राष्ट्र समिती किसान विभागाचे तालुका समन्वयक दादासाहेब महानवर, विकास भोसले, बाबा शेख, वस्ताद मौला, अतुल सलगर, धनंजय लोखंडे, कारभारी सलगर, हरिदास भांड, दशरथ वाडेकर आदी उपस्थित होते.
सुपनवर म्हणाले, तेलंगणाचे मुख्यमंत्री के. शंकरराव यांनी तेलंगणामध्ये शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज, पाणीपट्टी बिल माफ आहे. पेरणीसाठी 10 हजार रुपये एकरी, दलित बंधू योजनेतून दहा लाख रुपये अनुदान, धनगर समाज व ओबीसी समाज यांना प्रत्येकी दहा लाख रुपये अनुदान अशा 444 योजना राबवल्या आहेत. आता राज्यातील सर्व शेतकऱ्यांचे 19 हजार कोटी कर्ज माफ केले आहे. महाराष्ट्र सरकारनेही तेलंगणाच्या सरकारचा आदर्श घेऊन महाराष्ट्रतील शेतकऱ्यांची कर्ज माफी करावी