करमाळा (सोलापूर) : प्रधानमंत्री पथविक्रेता आत्मनिर्भर योजना (स्वनिधी) योजनेअंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र करमाळातर्फे स्वनिधी योजने अंतर्गत पात्र लाभार्थ्यांना बँके तर्फे कर्ज वाटपकरून कर्ज मंजुरी पत्र देण्यात आले. कार्यक्रमाच्यावेळी तुषार टांकसाळे यांनी योजनेचा इतिहास व योजनेबद्दल थोडक्यात माहिती सांगीतली. खाद्यपदार्थ विक्रेता संघ अध्यक्ष संजय घोरपडे यांनी योजनेचा उपयोग योग्य प्रकारे करून त्याची परतफेड व्यवस्थित प्रकारे करावी व पुढील टप्प्याचा लाभ घ्यावा, असे सांगीतले. सदर कार्यक्रमावेळी बँक अधिकारी मोहन कुमार, दुर्गुडे, प्रविण जाधव, अविनाश पेंटे, रवि कुलकर्णी, बलभीम बागल, नवनाथ देमुंडे, अश्विनी घोडके तसेच स्वनिधी लाभार्थी उपस्थित होते.
स्वनिधी योजने अंतर्गत लाभार्थ्यांना बँक ऑफ महाराष्ट्रतर्फे कर्ज वाटप
