करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात सुरु केलेल्या ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलच्या पहिल्याच अनोख्या विशेषांकाचे दिमाखात प्रकाशन झाले. हॉटेल राजयोगच्या निसर्गरम्य आणि सुसज्ज हॉलमध्ये आज (रविवारी) सांयकाळी विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. यावेळी सामाजिक कार्यकर्ते, प्रेरणादायी असलेले डॉक्टर, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिला शेतकरी व विविध उपक्रम राबणारे गणेशोत्सव मंडळे यांचा सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
माजी आमदार जयवंतराव जगताप, गटविकास अधिकारी मनोज राऊत, ज्येष्ठ पत्रकार डॉ. ऍड. बाबूराव हिरडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण साने, डॉ. अविनाश घोलप, डॉ. रविकिरण पवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. कविता कांबळे व ‘काय सांगता’चे संपादक अशोक मुरूमकर मंचावर उपस्थित होते.
‘या’ मंडळाचा झाला सन्मान…
वेताळ पेठ येथील गजानन स्पोर्ट क्लब, सरकार मित्र मंडळ, मेन रोड येथील गजराज मित्र मंडळ, दत्त पेठ तरुण मित्र मंडळ, राशीन पेठ तरुण मित्र मंडळ, नंदन प्रतिष्ठान व कर्मवीर अण्णासाहेब जगताप कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ.
‘या’ कर्तृत्वानांचा झाला सन्मान…
सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेट खाटेर, हरिश्चंद्र झिंजाडे, डॉ. शिवानी पाटील, डॉ. स्वाती घाडगे, डॉ. अफ्रिन बागवान, डॉ. प्रीती शेटे, हर्षली नाईकनवरे व अनुसया तळपाडे. (सविस्तर वृत्त काही वेळात)