In Raja Yoga a unique ceremony of KaySangtaa was held with the presence of dignitaries

करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात सुरु केलेल्या ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलच्या पहिल्याच अनोख्या विशेषांकाचे दिमाखात प्रकाशन झाले. हॉटेल राजयोगच्या निसर्गरम्य आणि सुसज्ज हॉलमध्ये विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत हा सोहळा रंगला. सामाजिक कार्यकर्ते, प्रेरणादायी असलेले डॉक्टर, कृषी क्षेत्रात उल्लेखनीय काम केलेल्या महिला शेतकरी व विविध उपक्रम राबणारे गणेशोत्सव मंडळे यांचा यावेळी सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.

माजी आमदार जयवंतराव जगताप, गटविकास अधिकारी मनोज राऊत, ज्येष्ठ पत्रकार डॉ. ऍड. बाबूराव हिरडे, सहाय्यक पोलिस निरीक्षक प्रवीण साने, डॉ. अविनाश घोलप, डॉ. रविकिरण पवार, पत्रकार संघाचे अध्यक्ष महेश चिवटे, स्त्रीरोग तज्ञ डॉ. कविता कांबळे व ‘काय सांगता’चे संपादक अशोक मुरूमकर मंचावर उपस्थित होते. प्रास्ताविक मुरूमकर यांनी केले. सूत्रसंचालन पत्रकार किशोर शिंदे यांनी तर आभार पत्रकार अण्णा काळे यांनी मानले.

‘यांची’ होती उपस्थिती
करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. गजानन गुंजकर, सावंत गटाचे सुनील सावंत, राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे, करमाळा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सचिव विठ्ठल क्षीरसागर, डॉ. अमोल घाडगे, प्रा. रामदास झोळ, डॉ. रोहन पाटील, माजी नगराध्यक्ष प्रशांत ढाळे, देवानंद बागल, भाजपचे दीपक चव्हाण, जगदीश अग्रवाल, अमरजित साळुंखे, वैभव पोळ, प्रशांत नाईकनवरे, बळीराजा शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब सुपनवर, पत्रकार विशाल घोलप, पत्रकार अशपाक सय्यद, पत्रकार शीतलकुमार मोटे, पत्रकार सिद्धार्थ वाघमारे, पत्रकार सुनील भोसले, पत्रकार दिनेश मडके, पत्रकार दस्तगीर मुजावर, राष्ट्रवादीचे सचिन नलवडे, संदीप पाटील, प्राचार्य मिलिंद फंड, प्रा. हनुमंत भोंग, प्रा. लक्ष्मण राख, सामाजिक कार्यकर्ते फारूक जमादार, सुरतला संगीत विद्यालयाचे प्राचार्य बाळासाहेब नरारे, चरणसिंग परदेशी, सामाजिक कार्यकर्त्या नलिनी जाधव, निलेश काळे, प्रा. नितीन तळपाडे, आदर्श शिक्षक एन. बी. ढाकणे, ग्राहक पंचायतचे तालुकाध्यक्ष ऍड. शशिकांत नरुटे, नरेंद्रसिंह ठाकूर, रघुवीर जाधव, श्री. हिरडे, रासपचे अंगद देवकते, ओंकार गायकवाड, बापू मुरूमकर, गणेश लोहार आदी उपस्थित होते.

‘या’ मंडळाचा झाला सन्मान…
वेताळ पेठ येथील गजानन स्पोर्ट क्लब, सरकार मित्र मंडळ, मेन रोड येथील गजराज मित्र मंडळ, दत्त पेठ तरुण मित्र मंडळ, राशीन पेठ तरुण मित्र मंडळ, नंदन प्रतिष्ठान व कर्मवीर अण्णासाहेब जगताप कला क्रीडा सांस्कृतिक मंडळ.

‘या’ कर्तृत्वानांचा झाला सन्मान…
सामाजिक कार्यकर्ते श्रेणिकशेट खाटेर, हरिश्चंद्र झिंजाडे, डॉ. शिवानी पाटील, डॉ. स्वाती घाडगे, डॉ. अफ्रिन बागवान, डॉ. प्रीती शेटे, हर्षली नाईकनवरे व अनुसया तळपाडे.

कोण काय म्हणाले
माजी आमदार जयवंतराव जगताप : पत्रकारितेत पारदर्शकता महत्वाची आहे. आणि पारदर्शकता ‘काय सांगता’ न्यूज पोर्टल सांभाळत आहे. तालुक्याचा विकास करण्यासाठी या पोर्टलचे योगदान नाकारता येणार नाही. डिजिटलच्या दुनियेत टाकलेले हे माध्यम महत्वाचे आहे. तालुक्याचा विकास करण्यासाठी काम करत असलेल्या या माध्यमाच्या मागे उभा राहून आपणही योगदान द्यावे.

ऍड. डॉ. बाबुराव हिरडे : ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलने समाजातील आदर्श व्यक्तींचा सन्मान केला आहे ही कौतुकाचीबाब आहे. बदलत्या काळानुसार माध्यमांनी बदलने आवश्यक आहे. काय सांगता न्यूज पोर्टलहे वास्तव चित्र मांडत असून समाजचे प्रश्न सोडवत आहे. एखाद्या माध्यमाने सामाजिक कार्यकरणाऱ्या वैयक्तीचा सन्मान करणे ही उल्लेखनीय गोष्ट आहे. त्यामुळे त्यांना यातून प्रोत्साहन मिळणार आहे.

महेश चिवटे : अशोक मुरूमकर यांच्या माध्यमातून ‘काय सांगता’ न्यूज पोर्टल करमाळा तालुक्यात दीड वर्षांपासून कार्यरत आहे. या पोर्टलने करमाळकरांचा विश्वास संपादन केला आहे. काय सांगता हे सकारात्मक आणि समाजाला दिशा देणारे माध्यम आहे. हे माध्यम नागरिकांचे प्रश्न सोडवण्यासाठी काम करत आहे. त्यामुळेच त्याची लोकप्रियता वाढत आहे.

डॉ. अविनाश घोलप : काय सांगता न्यूज पोर्टल सतत नवनवीन प्रयोग करत आहे. अशोक मुरूमकर यांच्या पत्रकारितेची सुरुवात करमाळ्यातून झालेली आहे. त्यांनी पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर, नगर अशा विविध ठिकाणी काम केले आहे. तेथील पत्रकारितेच्या अनुभवातून ते करमाळ्यात अतिशय चांगली पत्रकारिता करत आहेत.

डॉ. कविता कांबळे : काय सांगता न्यूज पोर्टलने करमाळ्यात काम करताना डॉक्टरांचा संघर्ष मांडला आहे. त्यांची प्रेरणा घेऊन इतरांनीही आपण या क्षेत्रात यावे म्हणून समाजासमोर प्रवास मांडला आहे. त्याशिवाय समाजातील विविध घटकांचीही दखल घेतली आहे. ही खोरोखऱ गौरवाचीबाब आहे. ‘काय सांगता’ न्यूज पोर्टल हे विश्वासास पात्र आहे.

मनोज राऊत : करमाळ्यातील पत्रकारिता ही अतिशय चांगली आहे. प्रशासनाच्या उणिवा आणि नागरिकांच्या समस्या मांडण्याचे काम केले जात आहे. काय सांगता न्यूज पोर्टलने समाजात विविध क्षेत्रात काम करणाऱ्या घटकांची दखल घेऊन प्रोत्साहन दिले आहे. हे असेच काम त्यांनी करावे. त्यामुळे या माध्यमांवरील विश्वास वाढत आहे. सकारात्मक पत्रकारिता करून समाज घडवण्यास हातभार लावावा.

विलासराव घुमरे : करमाळा शहरात ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलची सुरुवात कशी झाली हे मी जवळून पहिले आहे. दीड वर्षात अन्यायाला वाचा फोडण्याचे काम या माध्यमाने केले आहे. यापुढेही असेच काम त्यांनी करावे. करमाळा सारख्या ठिकाणी असे कार्यक्रम घेणे आणि वाचकांचा विश्वास संपादन करणे ही महत्वाची बाब आहे.

Subscribe to get access

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *