MP Ranjitsinha Naik Nimbalkar interacted with Kshitij Group

करमाळा (सोलापूर) : विविध सामाजिक उपक्रम स्वयंप्रेरणेतून राबवून सामाजिक क्षेत्रात नावलौकिक मिळवलेल्या शहरातील ‘क्षितिज ग्रुप’ या महिलांच्या ग्रुपमधील सदस्यांशी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी भेट घेऊन संवाद साधला.

ग्रुपच्या सदस्या डॉ. सुनीता दोशी, नलिनी जाधव, गीता कापडी यांनी ग्रुपच्या वतीने राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांची माहिती दिली. हे उपक्रम कुठलीही लोकवर्गणी, अनुदान न घेता फक्त ग्रुप सदस्यांच्या सहभागातून राबविण्यात येत असल्याची माहिती दिली. यावेळी निंबाळकर यांनी क्षितिज ग्रुपच्या सातत्यपूर्ण उपक्रमशीलतेची प्रशंसा करून खासदार व तुमचा भाऊ या नात्याने तुमच्या सामाजिक उपक्रमांसाठी तुम्ही सांगाल त्यावेळी आपण सहकार्य करू, असे आश्वासन दिले.

ग्रुपच्या वतीने यावेळी खासदार निंबाळकर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रुपच्या माधुरी साखरे, पुष्पाताई फंड, सुप्रिया येवले, नीलिमा पुंडे, कावेरी देशमुख, माधुरी परदेशी, स्वाती माने, मंजू देवी, उज्वला देवी, सुलभा पाटील तसेच भाजपचे जिल्हा सरचिटणीस गणेश चिवटे, शहराध्यक्ष जगदीश आगरवाल, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष शंभूराजे जगताप, शहराध्यक्ष प्रफुल्ल शिंदे आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *