करमाळा (सोलापूर) : उमरडमधील बेकायदा दारू विक्री व जुगार बंद करण्यासाठी ग्रामस्थ एकवटले आहेत. बहुजन संघर्ष सेनेचे जिल्हाध्यक्ष रजाभाऊ कदम, ग्रामपंचायत सदस्य समाधान वलटे, भगवान चौधरी, प्रमोद कुलकर्णी, राजू गोडगे यांनी गावकऱ्यांना एकत्र येण्याचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद देत शेकडो ग्रामस्थ बैठकीला उपस्थित राहिले.
बैठकीमध्ये गावकऱ्यांचा एकच सूर निघाला दारू जुगार गावातील कायमची बंद झाली पाहिजे. यासाठी उमरडचे आजी- माजी सरपंच, सदस्य यांनी भागच घेतला पाहिजे. उपसरपंच मुकेश बदे, माजी सरपंच बापू चोरमले, ग्रामपंचायत सदस्य इरफान शेख, ग्रामपंचायत सदस्य चांगदेव चौधारी उपस्थित होते. गुरुवारी (ता. 21) सकाळी ८ वाजता महादेव मंदिर येथे सर्व गावकऱ्यांनी एकत्र येऊन याबाबत चर्चा केली जाणार आहे.
बेकायदा व्यवसाय करणाऱ्याला या बैठकीत याबाबत सूचना दिल्या जाणार आहेत. त्यानंतर पोलिस स्टेशनाला रीतसर निवेदन दिले जाणार आहे. नंदकिशोर वलटे, श्रीमान चौधरी, पोलिस पाटील अंकुश कोठावळे, आप्पा कोठावळे, पवन मारकड, अनिल वलटे, बाळासाहेब घनवट, श्रीकांत मारकड, भास्कर पडवळे, भीमराव कोडलिंगे, सचिन बदे, प्रमोद पडोळे, अंगद पडवळे, बबन बदे, विनायक पडवळे, संदीप चौधरी, अजित चौधरी, श्रीकृष्ण गोडगे, विकास बदे, प्रदीप कोठावळे, रमेश चौधरी, औदुंबर काळोखे, विशाल चौधरी, नवनाथ कोठावळे, अंकुश वलटे, गणेश मारकड, सोमनाथ पठाडे, सत्यवान पाटील, शिवाजी बोराडे, प्रवीण शिंदे, संतोष पडवळे, विशाल वलटे, दासा लोखंडे, नितीन कदम, भाग्यवंत बंडगर, मारुती कोठावळे, मयूर मोरे, शुभम वलटे, प्रमोद वलटे, ज्ञानेश्वर वलटे, विशाल पठाडे, ओंकार जाधव, रुपेश कदम, ज्ञानेश्वर बदे, माणिक कोठावळे, रामदास हांडे, राजेश कदम, रमेश गोडगे, चंद्रशेखर पाटील, मुकेश बदे, प्रशांत पाखरे, निलेश चौधरी, उत्तम बदे, अशपाक पठाण, सारिका शिंदे, कल्पना कदम, साखरबाई इंगळे, राणी कदम, मंगल कदम, शितल शिंदे, सुमन शिंदे, संगीता वाघ, छाया शिंदे, रूपाली साळुंखे, शबाना शेख, प्रियंका चौधरी, रंजना पाखरे, मंगल टोणपे, धनश्री पाटील, नकोशा शिंदे, लता मोरे, वत्सला सुरवसे, बाळूबाई कदम, रंजना पाखरे, विजूबाई कदम, कोमल कदम आदी यावेळी उपस्थित होते.