Farewell ceremony of 10th students of Shree Chhatrapati Sambhaji Vidyalaya in Nimbore

करमाळा (सोलापूर) : निंभोरे येथील श्री छत्रपती संभाजी विद्यालयातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निरोप समारंभ झाला. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रविंद्र वळेकर होते. यावेळी सरपंच वळेकर यांनी दहावीच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले आणि आपल्या अनुभवातून शाळेतील जुन्या आठवणींना उजाळा देत याच शाळेतील यशस्वी विद्यार्थी व विद्यार्थिनींची अनेक उदाहरणे दिली. दहावी विद्यार्थी जीवनातील पहिला व महत्त्वाचा टप्पा आहे हे समजावून सांगत विद्यार्थ्यांना बोर्ड परीक्षेसाठी शुभेच्छा दिल्या. विद्यार्थ्यांना भेट म्हणून परीक्षेसाठी वापरले जाणारे स्टँडर्ड कंपनीचे परीक्षा pad दिले.

कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी दहावीचे विद्यार्थी, मुख्याध्यापक, शिक्षक, कर्मचारी यांनी परिश्रम घेतले. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच रविंद्र वळेकर, मुख्याध्यापक श्री. व्यवहारे यांच्यासह शिक्षक, शिक्षिका, कर्मचारी व विद्यार्थी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *