करमाळा (सोलापूर) : कंत्राटी शिक्षक व नोकर भरतीच्या निर्णयामुळे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने करमाळा तहसील कार्यालयासमोर आज (सोमवारी) सकाळी अर्धनग्न आंदोलन करण्यात आले.
सरकारच्या विरुद्ध यावेळी घोषणा देण्यात आल्या. डोल वाजवत सरकारच्या निर्णयाविरुद्ध यावेळी घोषणा देण्यात आल्या. प्रभारी तहसीलदार विजयकुमार जाधव यांनी निवेदन स्विकारले. यावेळी पोलिसांनी बंदोबस्त ठेवला होता. जिल्हा उपाध्यक्ष सुभाष ओहोळ, जिल्हा संघटक जालिंदर गायकवाड, विलास कांबळे, तालुका उपाध्यक्ष अजय पवळ, लक्ष्मण भालेराव, शहराध्यक्ष विशाल लोंढे, तालुकाध्यक्ष नंदकुमार कांबळे व तालुका संघटक शिवाजी भोसले आदी उपस्थित होते.
(बातमी कॉपी करुन घेताना संबंधीत प्रतिनीधीची मेहनत लक्षात घ्या)