करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील बाळेवाडी येथील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेत शिक्षक मिळावा, अशी मागणी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष दिनेश नलवडे यांच्यासह ग्रामस्थांनी केली आहे. करमाळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी मनोज राऊत यांना हे निवेदन देण्यात आले असून त्यावर ५० नागरिकांच्या सह्या आहेत. त्वरित शिक्षक मिळाला नाही तर आंदोलन केले जाईल असा इशाराही देण्यात आला आहे.
बाळेवाडी येथील ग्रामस्थांनी निवेदनात म्हटले आहे की, येथे पहिली ते सातवी पर्यंतचे ७४ विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. मात्र शिक्षक तीन आहेत. येथे एक जागा रिक्त असल्याने विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर परिणाम होत आहे. याकडे त्वरित लक्ष देण्यात यावे. निवेदन देतेवेळी अशोक नलवडे, रघुनाथ लोंढे, सूरज लोंढे व गणेश नलवडे उपस्थित होते. गटविकास अधिकारी राऊत यांनी शिक्षण देण्यासाठी प्रयत्न केला जाणार असल्याचे सांगितले आहे.