An overview of nine years will be presented to the general public in Karmala through Modi@9An overview of nine years will be presented to the general public in Karmala through Modi@9

करमाळा (सोलापूर) : नरेंद्र मोदी यांचा पंतप्रधानपदाचा नऊ वर्षाचा कार्यकाळ पूर्ण होत आहे. यामध्ये त्यांनी केलेल्या कामाची माहिती नागरिकांना देण्यासाठी भाजपने ‘मोदी@9’ हे विशेष जनसंपर्क अभियान सुरु केले आहे. या पार्श्वभूमीवर करमाळा येथे भाजप संपर्क कार्यालयात प्रमुख कार्यकर्त्यांची बैठक झाली. त्यानंतर पत्रकार परिषद घेऊन लोकसभा प्रवास प्रभारी जयकुमार शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन अभियानाची माहिती दिली आहे.

‘मोदी@9’ अभियान यशस्वी करण्यासाठी नियोजन केले असून यामध्ये १४ वेगवेगळे कार्यक्रम घेतले जाणार आहेत. ‘अभियान प्रारंभ रॅली, संपर्क से समर्थन (प्रभावशाली व्यक्ती भेट), विशाल जाहीर सभा, पत्रकार परिषद, बुद्धीवंतांचे संमेलन, सोशल मीडियावर प्रभावशाली व्यक्तींचा मेळावा, व्यापारी संमेलन, विकास तीर्थ, ज्येष्ठ कार्यकर्त्यांसमवेत स्नेहभोजन व संवाद, संयुक्त मोर्चा संमेलन, लाभार्थी संमेलन, योगा दिन, पंतप्रधान नरेंद्र मोदी व्हिडीओ कॉन्फरन्स व घरोघरी संपर्क’ हे कार्यक्रम यामध्ये घेतले जाणार आहेत. याबाबत शिंदे यांनी माहिती दिली.

यावेळी भाजपचे तालुकाध्यक्ष गणेश चिवटे, जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, तालुका सरचिटणीस काकासाहेब सरडे, मकाईचे संचालक हरिभाऊ झिंजाडे, आजिनाथचे माजी संचालक विठ्ठलराव शिंदे, राज्य परिषद सदस्य बाळासाहेब कुंभार, बिटरगाव श्री चे सरपंच अभिजीत मुरूमकर, वंजारवाडीचे प्रवीण बिनवडे, जातेगावचे छगन ससाने, वाशिंबेचे उपसरपंच अमोल पवार, तालुका प्रसिद्धी प्रमुख जयंत काळे पाटील, नितीन झिंजाडे, मच्छिंद्र फंड, संजय घोरपडे, जितेश कटारिया, महिला आघाडीच्या राजश्री खाडे, संगीता नष्टे, सोमनाथ घाडगे, धर्मराज नाळे, किरण शिंदे, विष्णू रणदिवे, राजू पवार, प्रकाश ननवरे, किरण बागल, संदीप काळे, नितीन झिंजाडे, नितीन निकम, नानासाहेब अनारसे, राजेश पाटील, विशाल घाडगे, अजय डौले, हर्षद गाडे, दत्तात्रय गाडे, सुनील जाधव, भैया कुंभार आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *