सोलापूर : भारत निवडणूक आयोगाकडून नागरीक व विदयार्थीमध्ये निवडणूक विषयक जनजागृती निर्माण करण्यासाठी जिल्हा निवडणुक अधिकारी तथा जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांचे अध्यक्षतेखाली निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करण्यात आल्याची माहिती उपजिल्हा निवडणूक अधिकारी गणेश निऱ्हाळी यांनी दिली.
महाविदयालय व विदयापीठातील विदयार्थीमध्ये निवडणूक साक्षरतेसंदर्भात जनजागृती, प्रचार आणि प्रसार व्हावा. तसेच प्रत्येक महाविदयालयामध्ये निवडणूक साक्षरता मंडळाची स्थापना करून अधिकाअधिक विद्यार्थ्यांचा सहभाग या मंडळात व्हावा या उददेशाने कामकाजाचे स्वरूप निश्चित करण्याबाबत रूपरेषा बैठकीत ठरविण्यात आली असल्याची माहिती श्री. निऱ्हाळी यांनी दीली.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आयोजित निवडणूक साक्षरता मंडळ स्थापना आढावा बैठकीत उपविभागीय अधिकारी सोलापूर क्र. 2 विठ्ठल उदमले, उपविभागीय अधिकारी अकलूज नामदेव टिळेकर, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठाचे संचालक आर. के. वडजे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य जाधवर ए.डी.,तहसिलदार शिल्पा ओसवाल, नायब तहसिलदार प्रविण घम, तसेच वर्कशप अर्थ फाऊंडेशनचे सीईओ तेजेश गुजराती तसेच दूरदृश्य प्रणाली व्दारे अन्य उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार व सर्व निवडणूक नायब तहसिलदार तसेच राष्ट्रीय सेवायोजनेचे जिल्हयातील एकूण 90 कार्यक्रम अधिकारी उपस्थित होते