करमाळा (रवी चव्हाण) : तालुक्यातील केत्तूर येथे संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन करण्यात आले. यावेळी विनोद चव्हाण यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळी सरपंच सचिन वेळेकर, उपसरपंच भास्कर कोकणे, माजी उपसरपंच हरिश्चंद्र खटमोडे, ऍड. संतोष निकम, रावसाहेब चव्हाण, विनोद चव्हाण, रवी चव्हाण, विशाल चव्हाण, मिलिंद चव्हाण, गणेश चव्हाण, श्रीरंग चव्हाण, सिद्धार्थ चव्हाण यांच्यासह प्रशांत नवले, सागर पवार, अंबादास कानतोडे, किशोर वेळेकर, विजय देवकते व शहाजी कनीचे उपस्थित होते.
केत्तूरमध्ये संविधान दिनानिमित्त संविधान प्रस्ताविकेचे सामूहिक वाचन
