सोलापूर : श्री क्षेत्र पंढरपूर येथे कार्तिकवारीनिमित्त 18 ते 27 नोव्हेंबर दरम्यान यात्रा असून पंढरपूर शहर बाह्यमार्गावरून जाणाऱ्या जड वाहतुकीमुळे पंढरपूर शहरात दाखल होणाऱ्या भाविकांच्या जिवितेला धोका व वाहतुक नियमनास अडथळा होऊ नये या करीता उपविभागीय पोलिस अधीकारी पंढरपूर उपविभाग पंढरपूर यांनी त्यांचेकडील 30 ऑक्टोबर 2023 अन्वये पंढरपूर शहराकडे येणारी जड अवजड वाहतुक संबंधीत पोलिस ठाणे हददीतील योग्य त्या पॉईन्टवरून बंद करून ती पर्यायी मार्गावरून वाहतुक वळविणेबाबत कळविले आहे.
त्या अनुषंगाने शिरीष सरदेशपांडे पोलिस अधीक्षक, सोलापूर ग्रामीण महाराष्ट्र पोलिस कायदा 1951 च्या कलम 33 (1) (ब) च्या अन्वये मला प्राप्त असलेल्या शक्तीच्या अधारे 18 ते 27 नोव्हेंबरपर्यंत पंढरपूर शहर बाहयमार्गावरून जाणारी जड वाहतुक अन्य पर्यायी मार्गाने वळविणे आवश्यक असल्यानेखालील नमुद पॉईन्टवरून जड अवजड वाहतुक बंद (शासकीय अन्नधान्य, डिझेल, पेट्रोल, गॅस सिलेंडर, उस वाहतुक करणारी वाहने वगळुन) करण्यात येत असल्याचे आदेश देत आहे.
पोलिस ठाणे : मोहोळ : जड वाहतुक प्रवेश बंद ठिाकाण- शिवाजी चौक- पर्यायी मार्ग– मोहोळ, कामती- मंगळवेढा- सांगोला. किंवा मोहोळ- शेटफळ- टेंभुर्णी- वेळापूर- सांगोला.
जड वाहतुक प्रवेश बंद ठिाकाण- शेटफळ चौक – पर्यायी मार्ग- शेटफळ- टेंभूर्णी- अकलुज- वेळापूर– महुद- सांगोला. किंवा शेटफळ- मोहोळ- कामती-मंगळवेढा– सांगोला.
जड वाहतुक प्रवेश बंद ठिाकाण : टाकळी सिकंदर– पर्यायी मार्ग- टाकळी सिकंद– कुरूल– मोहोळ- शेटफळ- टेंभुर्णी. किंवा टाकळी सिकंदर- कुरूल कामती- मंगळवेढा- सांगोला- महुद- वेळापूर.
पोलिस ठाणे : कामती– जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण– कुरूल चौक– पर्यायी मार्ग- करूल- कामती मंगळवेढा- सांगोला- महुद- वेळपूर- अकलुज. किंवा करूल- मोहोळ –शेटफळ- टेंभूर्णी –अकलुज- वेळापूर.
पोलिस ठाणे : टेंभूर्णी- जड वाहतुक प्रवेश बंद ठिाकाण– वेणेगाव फाटा- पर्यायी मार्ग– वेणेगाव- टेंभुर्णी- अकलुज- वेळापूर- महुद- सांगोला. किंवा वेणेगाव- शेटफळ- मोहोळ– कामती- मंगळवेढा- सांगोला.
पोलिस ठाणे : वेळापूर- जड वाहतुक प्रवेश बंद ठिकाण- श्री ज्ञानेश्वर चौक वेळापूर– पर्यायी मार्ग– वेळापूर- साळमुख– महुद- सांगोला- मंगळवेढ– कामती. किंवा वेळापूर- टेंभूर्णी- शेटफळ- मोहोळ– कामती.
साळमुख चौक : साळमुख महूद सांगोला मंगळवेढा कामती किंवा साळमुख– वेळापूर- टेंभूर्णी– शेटफळ– मोहोळ- कामती.
पोलिस ठाणे : सांगोला- जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण- महुद चौक– पर्यायी मार्ग– महुद- सांगोला मंगळवेढा- कामती- मोहोळ. किंवा महुद– वेळापूर- टेंभुर्णी–शेटफळ- मोहोळ.
जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण : मंळवेढा कोल्हापूर बायपास पुलाखाली– पर्यायी मार्ग- सांगोला- मंगळवेढा- कामती- मोहोळ- शेटफळ- टेंभूर्णी किंवा सांगोला– महूद- वेळापूर- टेंभूर्णी– शेटफळ- मोहोळ.
पोलिस ठाणे : मंगळवेढा- जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण- मंगळवेढा नाका बायपास– पर्यायी मार्ग- मंगळवेढा– कामती- मोहोळ- शेटफळ- टेंभूर्णी- किंवा मंगळवेढा– सांगोला- महुद- वेळापूर- टेंभूर्णी.
पोलिस ठाणे : करकंब – जडवाहतुक प्रवेश बंद ठिकाण- भोसे पाटी- पर्यायी मार्ग– करकंब– वेणेगाव- टेंभूर्णी- अकलुज– वेळापूर- महुद – सांगोला. किंवा करकंब– वेणेगाव- शेटफळ- मोहोळ- कामती– मंगळवेढा – सांगोला. कार्तिकीवारी कालावध संपताच पंढरपूर जड वाहतुक नियमन दि. 7 एप्रिल 2019 च आदेश पुर्ववत अमंलात राहिल, असे आदेशात नमूद केलेले आहे.