पुणे : चुकीच्या जीवनशैलीमुळे व खाण्या-पिण्याच्या सवयींमुळे अनेक शारीरिक व मानसिक समस्यांना निमंत्रण देत आहे. या परिस्थितीत बदल करण्याची वेळ आली असून त्यासाठी सोपे आणि व्यवहार्य मार्गात शारीरिक आणि मानसिक समस्यांनावर मात करण्यासाठी काय करावे? यासाठी पुण्यात ‘सन टु ह्युमन फाउंडेशन’तर्फे सहा दिवसाचे ‘नए दृष्टिकोण वाला’ शिबिर होणार आहे. या शिबीरात पूज्य परम आलयजी हे प्रयोग करणार आहेत. सहभागी होणार्या व्यक्तींना रोजच्या सत्रानंतर साधा आरोग्यदायी अल्पोपहार देण्यात येईल. या अदृश्य अल्पोपाहारात आपल्या शरीराला आवशयक असलेले प्रथिने कर्बोदके, ऊर्जा असे अत्यंत महत्वाचे घटक समाविष्ट असतील.
आजवर जगात विविध ठिकाणी मिळून अशी 250 शिबिरे आयोजित झाली असून सहभागी व्यक्तींना त्यांच्या भावनिक आणि शारीरिक व्यथांपासून सुटका झाली आहे आणि आता ते प्रेम आणि आनंदाने भरलेले जीवन व्यतीत करीत आहेत. हे शिबिर वर्धमान सांस्कृतिक केंद्र, बिबवेवाडी- कोंढवा रस्ता, पुणे येथे 19 ते 24 नोव्हेंबर दरम्यान होणार असून त्याची वेळ सकाळी 6.30 ते 8.30 अशी आहे. शिबिरासाठी कसलेही शुल्क नाही. शिबिरात सहभागी होऊ इच्छिणा-यांनी ttps://forms.gle/pdsTLBrzY56f9nh86 येथे नाव नोंदवावे किंवा मीरा 8827453884, तारिणी 8359976000 अथवा श्रावण डहीर्रींरप 9669288957 यांच्याशी संपर्क साधावा.