करमाळा (सोलापूर) : गेल्या काही दिवसांपासून करमाळा तहसील कार्यालयात नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी येत आहेत. त्या तक्रारी जाणून घेऊन सोडवणूक करण्यासाठी आमदार संजयमामा शिंदे हे स्वतः आज (शुक्रवारी) १ वाजताच्या सुमारास तहसील कार्यालयात उपस्थित राहणार आहेत. नागरिकांनी यावेळी आपल्या समस्या मांडाव्यात असे आवाहन करण्यात आले आहे.
करमाळा तालुक्याला साधणार सहा महिन्यापासून तहसीलदार नाहीत. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांच्या रस्ता केस व इतर प्रश्न प्रलंबित आहेत. पीएम किसानचे पैसे मिळत नसल्याचेही अनेक तक्रारी आहेत. सततचा पाऊसचे अनुदान व पीक विम्याचे पैसे मिळाले नसल्याचे सांगितले जाते. कार्यालयात अनेकदा वेळेवर कर्मचारी नसल्याने सर्वसामान्य नागरिकांना हेलपाटे मारावे लागत असल्याच्याही तक्रारी आहेत. पुरवठा विभागातही अनेक तक्रारी येत आहेत. याचा निपटारा व्हवा व अधिकाऱ्यांशी समन्वय रहावा म्हणून तक्रारीची सोडवणूक करण्यासाठी आमदार शिंदे हे आज उपस्थित राहणार आहेत. पंचायत समिती व बांधकाम विभागातही अनेक तक्रारी आहेत. याची सोडवणूक केली जाणार आहे.