करमाळा (सोलापूर) : भारत स्काऊट गाईडच्या वतीने दिला जाणारा जिल्हास्तरीय उत्कृष्ट केंद्रप्रमुख पुरस्कार केंद्रप्रमुख संतोष पोतदार यांना शिक्षण अधिकारी सुलभा वटारे यांच्या हस्ते देण्यात आला. यावेळी गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, विस्तार अधिकारी सुग्रीव निळ, जयवंत नलवडे, केंद्रप्रमुख आमृत सोनवणे, जिल्हा संघटक श्रीधर मोरे, अनुसया सिरसाठ, तृप्ती अंधारे, दत्तात्रय गाजरे आदी उपस्थित होते.
पोतदार यांनी जातेगाव केंद्रातील १२ शाळेमधील जास्त विद्यार्थी नोंदणी करून विविध उपक्रमांद्वारे केंद्रात विदयार्थी गुणवत्ता वाढीसाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या कार्याची दखल घेऊन हा पुरस्कार देण्यात आला. त्यांच्या या यशाबद्दल विद्या विकास मंडळाचे अध्यक्ष मिलिंद फंड, प्रा. बाळासाहेब नरारे, नगरसेवक महादेव फंड, नगरसेवक अतुल फंड, संतोष वारे, मुख्याध्यापक पोपट थोरात, केंद्र प्रमुख रमाकांत गटकळ, सुहास कांबळे, अशोक बरडे, डॉ. महेश वीर, जिल्हा संचालक हनुमंत सरडे, चंद्रहास चोरमोले, चेअरमन आदिनाथ देवकते, अरून चौघुले, शिवाजी लोकरे, गणेश आडेकर, चंद्रकांत वीर, महादेव शिंदे, चेअरमन सतीष कांबळे, केंद्र प्रमुख विकास काळे, जहांगीर सय्यद, महेश होनकळसे, श्री. गरजे, शिवाजी येडे, स्वप्नील पाटील, हौसराव काळे, नाना वारे, बापू भगत यांनी अभिनंदन केले.