Mangeet Shinde group Dinner Diplomacy former MLA Jagtap along with local activists present

करमाळा (अशोक मुरूमकर) : आमदार संजयमामा शिंदे यांचे मांगी येथील समर्थक सामाजिक कार्यकर्ते सुजित बागल यांच्या निवासस्थानी शिंदे गटाची ‘डिनर डिप्लोमसी’ झाली. यावेळी आमदार संजयमामा शिंदे व माजी आमदार जयवंतराव जगताप उपस्थित होते. यासह या भागातील शिंदे गटाचे काही कार्यकर्तेही उपस्थित होते. यावेळी कार्यकर्त्यांमध्ये राजकीय चर्चाही रंगल्या होत्या. या भागात बागल यांचे राजकीय वजन वाढत असल्याचे यावेळी दिसून आले.

सुजित बागल हे मांगी परिसरातील आमदार शिंदे गटाचे विश्वासू मानले जातात. त्यांचा सध्या या भागात जनसंपर्क वाढला आहे. आमदार शिंदे यांच्या माध्यमातून या भागात जास्तीत जास्त विकास निधी आणण्यासाठी त्यांचा प्रयत्न सुरु आहे. प्रत्येक गावात आमदार शिंदे यांचा कार्यकर्ता तयार व्हावा म्हणून ते स्थानिकांना बळ देण्याचे काम करत आहेत.

बागल यांच्या घरी झालेल्या स्नेहभोजनावेळी आमदार शिंदे, माजी आमदार जगताप, बारामती ॲग्रोचे उपाध्यक्ष सुभाष गुळवे, वाशिंबेचे सरपंच तानाजी झोळ, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी संचालक चंद्रकांत सरडे, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य ऍड. राहुल सावंत, माजी सरपंच दादासाहेब जाधव, उदय ढेरे, बिटरगाव श्री येथील सामाजिक कार्यकर्ते बबनदादा मुरूमकर, पंचायत समितीचे माजी सदस्य बापूराव गायकवाड, वंजारवाडीचे सरपंच किरण फुंदे, जातेगावचे प्रवीण शिंदे, राष्ट्रवादीचे अभिषेक आव्हाड, ऍड. कमलाकर वीर, कामोणेचे सरपंच रमेश खरात, पंकज नलवडे, संभाजी नलवडे, जातेगावचे तुषार शिंदे, वीट येथील सूरज ढेरे, लक्ष्मण फुंदे आदी उपस्थित होते.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *