पुणे : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज (शनिवारी) पुण्यातील शासकीय विश्रामगृह येथे कालवा सल्लागार समितीची बैठक झाली. कुकडी संयुक्त प्रकल्प उन्हाळी हंगामी २०२३- २४ च्या नियोजनाबाबत उपमुख्यमंत्री तथा कुकडी संयुक्त प्रकल्पाचे अध्यक्ष पवार यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीला मंत्री दिलीप वळसे पाटील, कर्जत- जामखेड मतदारसंघाचे आमदार रोहित पवार, करमाळ्याचे आमदार संजयमामा शिंदे, आमदार राम शिंदे यांच्यासह कुकडी संयुक्त प्रकल्पाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

