MP Nimbalkar will take out a grand procession in Karmala if the Jategaon to Temburni highway is clearedMP Nimbalkar will take out a grand procession in Karmala if the Jategaon to Temburni highway is cleared

करमाळा (सोलापूर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी जातेगाव ते टेंभुर्णी या महामार्गाचे काम त्वरित मार्गी लावावे. त्यांची आम्ही करमाळ्यात भव्य मिरवणूक काढू असे आव्हान राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संतोष वारे यांनी दिले आहे. खासदार निंबाळकर हे आज (गुरुवारी) करमाळा दौऱ्यावर येत असताना ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलशी बोलताना वारे यांनी दिलेले आव्हान महत्वाचे मानले जात आहे.

वारे म्हणाले, जातेगाव ते टेंभुर्णी महामार्ग दळणवळणाच्या दृष्टीने महत्वाचा आहे. या महामार्गावरून रोज हजारो वाहने जातात. नगरपासून जातेगावपर्यंत महामार्गाचे काम सुरु आहे. मात्र जातेगावपासून टेंभुर्णीपर्यंतचे काम अजूनही सुरु झालेले नाही. येथे भूसंपादनाचा प्रश्न असल्याचे सांगितले जात आहे. खासदार निंबाळकर यांनी प्रश्न मार्गी लावणे आवश्यक आहे. केंद्रात आणि राज्यात भाजपचे सरकार आहे. मग करमाळा तालुक्यातील प्रश्न मार्गी का लागू शकत नाही. हा प्रश्न त्यांनी मार्गी लावला तर त्यांची करमाळ्यात भव्य मिरवणूक काढू असे ते म्हणाले आहेत. या महामार्गावर सतत अपघात होत आहेत. आतापर्यंत या महामार्गावर अपघातात शेकडो बळी गेले आहेत. हे अपघात थांबवणे आवश्यक आहे. या मार्गावरून आषाढीला हजारो वारकरी पंढरपूरला जातात, असेही वारे म्हणाले आहेत.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *