करमाळा (सोलापूर) : श्रेया शरद कोकीळ हिची सेंट्रल युनिवरसिटी ऑफ तामिळनाडू थरूर येथे रिसर्च प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. या अगोदर तिने जम्मू काश्मीर येथे रिसर्च स्कॉलर म्हणून सहा महिन्याचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. यानंतर तिची तामिळनाडू येथे रिसर्च प्रोग्रामसाठी निवड झाली आहे. या निवडीबद्दल करमाळा भाजपा तालुकाध्यक्ष गणेश चिवटे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.
चिवटे म्हणाले, विद्यार्थ्यांनी नियमित अभ्यास करून आई- वडिलांचा, गुरुजनांचा लौकिक वाढवावा व आपले करिअर उज्वल करावे. यावेळी भाजपचे जिल्हा सरचिटणीस किरण बोकन, बाळासाहेब कुंभार, संजय घोरपडे, बाळासाहेब होसिंग, धर्मराज नाळे, दादासाहेब देवकर, दासाबापु बरडे, अमोल पवार, नितीन झिंजाडे, विष्णू रणदिवे, मच्छिंद्र हाके, सोमनाथ घाडगे, आजिनाथ सुरवसे, विनोद महानवर, जयंत काळे पाटील, हर्षद गाडे, किरण शिंदे, आबा वीर, कैलास पवार, समाधान काळे, संदीप काळे, लक्ष्मण काळे, किरण बागल, प्रकाश ननवरे, विशाल घाडगे, मनोज मुसळे, महादेव गोसावी आदी पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.