सोलापूर : माजी सैनिक, विधवा तसेच त्यांच्या अवलंबिताचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक यांचा सोलापूर जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत दौरा होणार आहे; अशी माहिती जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी दिली. जिल्ह्यातील सर्व तालुक्याच्या ठिकाणी हा दौरा असून या दौऱ्या दरम्यान तालुका पातळीवरील समितीची बैठक घेण्यात येणार आहे.

या बैठकीत आजी- माजी सैनिक, विधवा त्यांच्या अवलंबिताच्या आडीआडचणी सोडविण्यात सोडविण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील सर्व माजी सैनिक विधवांनी आपलया समस्यांचे निराकरण करण्यासाठी संबंधित तहसिल कार्यालय येथे उपस्थित राहून जास्तीत जास्त माजी सैनिक सैनिक विधवांनी याचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी केले आहे.

जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी व कल्याण संघटक यांच्या दौऱ्याचे ठिकाण आणि वेळ पुढील प्रमाणे : 30 जानेवारी, तहसिल कार्यालय, करमाळा, 6 फेब्रुवारी, तहसिल कार्यालय माळशिरस, 13 फेब्रुवारी, तहसिल कार्यालय मोहोळ, 20 फेब्रुवारी, तहसिल कार्यालय सांगोला, 27 फेब्रुवारी, तहसिल कार्यालय उत्तर सोलापूर, 5 मार्च तहसिल कार्यालय पंढरपूर, 12 मार्च तहसिल कार्यालय दक्षिण सोलापूर, 19 मार्च तहसिल कार्यालय माढा, 26 मार्च तहसिल कार्यालय अक्कलकोट, 2 एप्रिल तहसिल कार्यालय, बार्शी या सर्व संबधित ठिकाणी सकाळी 11.30 वा. या वेळेत होणार आहे.