Machchindra Nusta Vidyalaya and Junior College in Kavitgaon in Independence Day spiritMachchindra Nusta Vidyalaya and Junior College in Kavitgaon in Independence Day spirit

करमाळा (सोलापूर) : कविटगाव येथील मच्छिंद्र नुस्ते विद्यालय व जुनिअर कॉलेज येथे स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा झाला. संस्थेचे अध्यक्ष एन. बी. नुस्ते व उपाध्यक्ष परेशकुमार दोशी यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी गुणवंत विद्यार्थ्यांना बक्षीस वितरण करण्यात आले. दोशी म्हणाले, स्वतंत्र्यासाठी त्याग केलेल्या पिढीचे योगदान आजची पिढी विसरत चालली असून अशा स्थितीत फक्त स्वातंत्र्य दिन व प्रजासत्ताक दिन या दिवशी देशप्रेम दाखवण्यापेक्षा देशाविषयी काय आदर व प्रेम प्रत्येकाच्या मनात कायम कायमस्वरूपी निर्माण होणे गरजेचे आहे.

पत्रकार गजेंद्र पोळ यांनी तालुक्यात गोरगरीब शेतकरी शेतमजूर यांच्या मुलांसाठी दर्जेदार व्यावसायिक शिक्षणाच्या संधी उपलब्ध झाल्या पाहिजेत. यासाठी तालुक्यातील या क्षेत्रातील मंडळींनी पुढाकार घेण्याची गरज असल्याचे सांगितले. शिक्षक निमगिरे म्हणाले, पर्यावरण रक्षणासाठी वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धनाची गरज आहे. स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक भोसले यांनी केले तर आभार लिमकर यांनी मानले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *