करमाळा (सोलापूर) : श्री मकाई सहकारी साखर कारखान्याच्या मागील हंगामातील थकीत ऊस बिलासाठी पुकारण्यात आलेला करमाळा बंद मागे घेण्यात आला आहे. मात्र भाजपासी झालेले मकाईचे माजी अध्यक्ष दिग्वीजय बागल यांच्या घरावर संतप्त शेतकर्यांचा आज मोर्चा असणार आहे.
मकाईच्या ऊस बिलाबाबत श शेतकऱ्यांना आश्वासन दिले होते. परंतु अद्यापपर्यंत शेतकऱ्यांना ऊस बीलाची रक्कम मिळाली नाही. तसेच मार्गदर्शन ही मिळाले नाही व कोणावरही कारवाई झाली नाही म्हणून आज (गुरुवारी) गुरूवारी सकाळी 11 वाजता पोथरे नाका, सावंत गल्ली येथून तत्कालीन चेअरमन यांच्या घरावर मोर्चा काढण्यात येणार असल्याचा इशारा आंदोलनकर्ते यांनी दिला आहे. तसेच करमाळा बंदचे आवाहन तात्पुरते स्थगित केले आहे. यावेळी ॲड. राहुल सावंत, दशरथ कांबळे, प्रा. रामदास झोळ, वामन बदे, रवींद्र गोडगे, राजेश गायकवाड, शहाजीराजे माने, हरिदास मोरे, बाळासाहेब गायकवाड, गणेश वाळुंजकर आदी उपस्थित राहणार आहेत.