करमाळा (सोलापूर) : शिवसेना जिल्हाप्रमुख जिल्हा नियोजन समितीचे सदस्य महेश चिवटे यांचा वाढदिवसानिमित्त खासदार रणजीतसिंह नाईक निंबाळकर, आमदार शहाजी बापू पाटील, शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे, मुख्यमंत्री यांचे विशेष कार्य अधिकारी मंगेश चिवटे, जिल्हा परिषदचे माजी उपाध्यक्ष राजेंद्र बारकुंड आदींच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला.

चिवटे हे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे कार्यकर्ते आहेत. एखादा निर्णय घेतला तर ते माघार घेत नाहीत व अन्याय सहन करत नाहीत हे त्यांच्या स्वभावाचे वैशिष्ट्यअसून ते कोणापुढे आपला स्वाभिमान गहाण ठेवत नाहीत, असे शिवसेना प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनी शुभेच्छा देताना सांगितले. खासदार निंबाळकर यांनी तालुक्यातील रिटेवाडी उपसा सिंचन योजनेचे विधानसभेच्या निवडणुकीपूर्वी भूमिपूजन होईल, असे आश्वासन दिले. सोलापूरचे सामाजिक कार्यकर्ते रसूल पठाण यांनी 100 किलोच्या गुलाबाच्या फुलाचा हार सत्कारासाठी आणला होता. महिला आघाडी जिल्हाप्रमुख आरती बसवंती, युवासेना- शिवसेनाचे पदाधिकारी यावेळी उपस्थित होते. दरम्यान आमदार शहाजी बापू पाटील शुभेच्छा देताना म्हणाले, ‘चिवटे यांच्या आगामी विधानसभेसाठी आम्ही पाठीशी खंबीरपणे उभे आहोत’.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *