MLA Sanjay Shinde Amdar Apya Dari in Navi Mumbai

करमाळा तालुका रहिवासी संघाकडून नवी मुंबई येथे आमदार आपल्या दारीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी नवी मुंबई रहिवाशी संघाच्या वतीने आमदार संजयमामा शिंदे यांचा सन्मान करण्यात आला. लोकप्रतिनिधी म्हणून आमदार शिंदे हे करमाळा मतदारसंघांमध्ये चांगले काम करत आहेत. त्यामुळे सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमासाठी शशिकांत राऊत, आप्पासाहेब परदेशी, अतिरिक्त जिल्हाधिकारी पद्माकर रोकडे, चंद्रकांत मकर, अमोल आमले, सुरेश सारंगकर, ऍड. गायकवाड, सुनील कुराडे, विजय ठाकर, रॉबिन मढवी, आबा सरक, संजय घाडगे, दत्तात्रय लोंढे, रमेश चोपडे, पंडित लेंगरे, सतीश शेलार, युवराज गोमे, सूर्यराज पतपेढी, संजय जाधव, भानुदास खैरे, सचिन मस्तुद उपस्थित होते.

आमदार शिंदे म्हणाले, 2019 मध्ये विधानसभा सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर सरकार स्थापन व्हायला झालेला विलंब झाला. त्यानंतर महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले कामास सुरुवात होणार तोपर्यंत कोरोनाचे नवे संकट आले. याचे रूपांतरही आपण संधीत केले. कोरोना काळात फक्त आरोग्यावरती खर्च केला जात होता. आपण करमाळा तालुक्यातील आरोग्य व्यवस्था भक्कम आणि सक्षम करण्याच्या दृष्टीने जेऊर येथील ग्रामीण रुग्णालय सुरू करणे, करमाळा उपजिल्हा रुग्णालयाचे श्रेणीवर्धन करून 100 कॉटमध्ये रुपांतर करणे, दवाखान्यातील अधिकारी व कर्मचारी यांच्यासाठी वसाहत बांधणे, ऑक्सिजन प्लांट सुरू करणे, एक्स-रे मशीन देणे, सिझेरियन विभाग सुरू करणे, अस्थिभंग प्रमाणपत्र देण्याची व्यवस्था करणे, रुग्णवाहिका देणे याला प्राधान्य दिले.

पुढे बोलताना ते म्हणाले, त्यानंतर युतीचे सरकार आले. दरम्यान तालुक्यातील विकास कामांना स्थगिती देण्यात आली. पुन्हा महायुतीचे सरकार आल्यानंतर विकास कामावरील स्थगिती उठविण्यात आली त्यानंतर निधीचा ओघ तालुक्यात सातत्याने सुरू आहे, असे आमदार शिंदे म्हणाले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शशिकांत राऊत यांनी केले. सुरेश सारंगकर, युवराज गोमे यांनी मनोगते व्यक्त केली. तर आभार भजनदास खैरे यांनी मानले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *