करमाळा (सोलापूर) : करमाळा अर्बन बँकेवरआरबीआयने निर्बंध लावल्याने बँकेचे आर्थिक व्यवहार ठप्प झाले होते. आर्थिक स्थिती पूर्वपदावर आणण्यासाठी प्रशासक मंडळ बरखास्त करून प्रशासक नेमण्यात आले होते.सुरुवातीला दिलीप तिजोरे यांची प्रशासक पदी नेमणूक झाली होती. त्यांच्या बदलीनंतर विष्णुपंत डोके यांनी बँकेच्या प्रशासकपदाचा पदभार घेतला होता. त्यांनी थकबाकी वसुलीसाठी जप्तीसारखी कायदेशीर कार्यवाही करून कर्जदारांच्या प्रत्यक्ष गाठीभेटी घेऊन कर्जदारांना कर्ज भरण्यासाठी प्रवृत्त केले. बँकेची थकबाकी कमी करणेसाठी डोके यांनी एक रक्कमी कर्ज फेड योजना स्वीकारून 95 कर्ज खाती बंद करून २ कोटी ६ लाख 94 हजारची वसुली केली असल्याने बँकेच्या व्याज उत्पन्नात वाढ झाली आहे.
करमाळा अर्बन बँकेने रिझर्व बँक ऑफ इंडिया यांनी वेळोवेळी सांगितलेल्या सूचना व त्यांच्या नियमांना अनुसरून बँकेची प्रगती केलेली असल्याने बँकेवरील निर्बंध कमी करणे कामी रिझर्व बँकेस करमाळा अर्बन बँकेने केलेल्या प्रगतीच्या आलेखावरून करणार असल्याचे प्रशासक डोके यांनी सांगितले. ठेवीदारांनी बँकेत ठेवलेल्या ठेवीतूनच गरजू कर्जदारांना कर्ज वाटप केले जाते, थकीत कर्जदारांनी लवकरात लवकर आपल्याकडील थकीत कर्जाचा भरणा बँकेत करून बँकेची थकबाकी कमी करण्यास हातभार लावावा, अन्यथा नाईलाजाने कर्जासाठी आपण दिलेल्या तारण मालमत्तेचा जाहीर लिलाव करून बँकेची थकबाकी आम्हाला वसूल करावी लागेल, असे नूतन व्यवस्थापक प्रकाश क्षीरसागर यांनी सांगितले.
आज अखेर अर्बन बँकेकडे रोख स्वरूपात शिल्लक रक्कम रुपये 36 कोटी 12 लाख 17 हजार (3612.17) आहे, त्यामुळे ठेवीदारांनी घाबरून जाण्याचे कारण नसून अफवांवर विश्वास ठेवू नये, बँकेकडे असलेल्या ठेवींना विमा सुरक्षा असल्याने बँकेतील ठेवी सुरक्षित असून ठेवीदारांनी निश्चित रहावे. रिझर्व बँकेने ठरवून दिलेले वसुलीचे उद्दिष्ट या बँकेने मोठ्या स्वरूपात पूर्णत्वास नेल्याने लवकरच बँकेवरील निर्बंध शिथिल होऊन आर्थिक व्यवहार पूर्वपदावर येऊन सर्वसामान्यांची बँक म्हणून पूर्वीसारखीच सुरळीत सुरू होईल असे प्रशासक श्री डोके यांनी शेवटी सांगितले.
बँकेच्या आर्थिक प्रगतीचा तपशिल
दिनांक 29/02/2024 अखेर. (आकडे लाखात)
ठेवी……. 3881.31
कर्ज……. 1001.88
बँकेकडे असलेली शिल्लक …3612.17
एन. पी.ए.ग्राॅस………………..654.88
एन.पी.ए.नेट………………….000 %
नेट वर्थ……………… … +158.58
वाढलेले शेअर्स………….. ……157.00
एकुण भाग भांडवल………..1350.17
सी आर.ए.आर………….+66.89%