करमाळा (अशोक मुरुमकर) : आमदार संजयमामा शिंदे यांच्या वाढदिवसानिमीत्त करमाळा येथील जीन मैदान येथे भरविण्यात आलेल्या निकाली जंगी कुस्त्यांच्या मैदानात प्रथम क्रमांकाची कुस्ती करत सिकंदर शेखने चांदीची फटकावली आहे. उमेश मथुरा व शेख यांच्यात निकाली कुस्ती झाली. पोलिस निरीक्षक विनोद घुगे व माजी महाराष्ट्र केसरी चंद्रहास निमगीरे यांनी पंच म्हणून काम पाहिले.
भरवण्यात आलेल्या या कुस्ती मैदानात एकास एक अशा पैलवानांच्या कुस्त्या झाल्या आहेत. यामध्ये काही महिला पैलवानांच्याही कुस्त्या झाल्या आहेत. आमदार शिंदे, माजी आमदार जयवंतराव जगताप, सरपंच तानाजी झोळ, सुजित बागल, अॅड. राहुल सावंत, भोजराज सुरवसे, दत्तात्रय अडसुळ, बबनराव मुरुमकर, युवराज गपाट, डॉ. कोळेकर, राजेंद्र बारकुंड, तुषार शिंदे, सुरज ढेरे, डॉ. विकास वीर, उमेश इंगळे, विलास पाटील आदी यावेळी उपस्थित होते. बालारफी शेख व सदगीर यांच्यात यावेळी कुस्ती झाली मात्र ती जोडीवर सोडण्यात आली.