करमाळा (सोलापूर) : डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशालेत करमाळा नगरपालिका शिक्षण मंडळच्या वतीने आंतरशालेय क्रीडा व सांस्कृतिक महोत्सव झाला. या महोत्सवा दरम्यान क्रिडा स्पर्धेत नामसाधना प्राथमिक विद्यामंदिर सेंट्रल स्कूल मुले नं. १ ने मुले विभागातून वैयक्तिक क्रिडा प्रकारातील १५ पैकी १० बक्षिसे पटकावली. तसेच सांघिक क्रिडा प्रकारात कबड्डीचे विजेतेपद पटकावले. व तीन पायाची शर्यतीमध्ये द्वितीय क्रमांक मिळवला. क्रीडा संचलनामध्ये आर्मीच्या वेशामध्ये छोट्या बालवीरांनी शिस्तबद्ध पद्धतीने संचलन करून द्वितीय क्रमांक मिळवून प्रेक्षकांची मने जिंकली.
लहान गट (लिंबू चमचा) : शिवांश लावंड, शर्विल मस्कर व शौर्य राखुंडे. 50 मीटर धावणे : स्वानंद काळदाते. मोठा गट (लिंबू चमचा) : जय थाटे, यशराज पाटील. 100 मीटर धावणे : प्रतिक शेरे, यशवर्धन देशमुख. तीन पायाची शर्यत : सौरभ बागल, तन्मय कलाल : शिक्षकांची संगीत खुर्ची : सुरेखा कांबळे यांना पारितोषक मिळाले.
समूह नृत्य स्पर्धेत या शाळेने लहान गटात प्रथम क्रमांक पटकावला. मोठ्या गटातही द्वितीय क्रमांक पटकावला. या क्रिडा व सांस्कृतिक महोत्सवातील यशस्वी विद्यार्थ्यांना शाळेच्या मुख्याध्यापिका सुनंदा जाधव, सुरेश कोळी, लालासाहेब शेरे, सुनिता शितोळे, सुनिता भैलुमे, धनश्री उपळेकर, मंगल गलांडे, सुषमा केवडकर, आशा अभंगराव, वैशाली जगताप, सुरेखा कांबळे, अश्विनी ठाकरे यांनी मार्गदर्शन केले. आंतरशालेय क्रिडा व सांस्कृतिक स्पर्धेतील यशाबद्दल तहसीलदार शिल्पा ठोकडे, गटशिक्षणाधिकारी राजकुमार पाटील, मुख्याधिकारी लक्ष्मण राठोड, प्रशासनाधिकारी अनिल बनसोडे व केंद्र समन्वयक दयानंद चौधरी, शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा डॉ. वर्षा करंजकर यांनी कौतुक केले.