करमाळा (सोलापूर) : करमाळा शहरात पाणी टंचाई जाणवू लागली आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये संताप व्यक्त केला जात आहे. याकडे प्रशासनाने गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी केली जात आहे. काही ठिकाणी दूषित पाणी पुरवठा होत असल्याने नगरपालिकेच्या कामकाजाविरुद्ध नाराजी व्यक्त केली जात असून या प्रकाराबाबत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने आंदोलनाचा इशारा दिला आहे.
मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष नानासाहेब मोरे म्हणाले, करमाळा नगरपालिकेच्या नळाला चार दिवसांनी पाणी सुटते. ते पाणी सुटल्यानंतर दूषित पाणी येत आहे. नागरिकांना दूषित पाणी घ्यावे लागत असून जलवाहिनीची त्वरित दुरुस्ती करावी, दुरुस्त न केल्यास करमाळा नगरपालिकेचे मुख्याधिकारी यांना मंगळवारी (ता. २) हेच घाण पाणी देणार असल्याचा इशारा दिला आहे.