वेदांत व्हटकर याची नवोदय विद्यालयसाठी निवड

Selection of Vedanta Bhatkar for Navodaya Vidyalaya

करमाळा (सोलापूर) : केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्डाच्या वतीने नवोदय विद्यालय प्रवेशासाठी घेण्यात येणाऱ्या प्रवेश परीक्षेचा निकाल नुकताच जाहीर झाला आहे. त्यात पहिल्याच फेरीमध्ये वेदांत व्हटकर या विद्यार्थ्यांची निवड झाली आहे. व्हटकर हा विद्यार्थी कोंढेजचा असून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वरकटणे येथे तो शिक्षण घेत आहे.

वेदांत पहिली ते पाचवीमध्ये एटीएस, मंथन या स्पर्धा परीक्षांमध्ये राज्यस्तरीय गुणवत्ता यादीत पहिल्या पाचमध्ये आला आहे. यासाठी त्याला पहिलीपासून वर्गशिक्षक सचिन व्हटकर यांचे मार्गदर्शन लाभले. पुढे त्याला नवोदय विद्यालयाबद्दल आकर्षण वाटू लागल्याने त्याने प्रवेश मिळवण्याच्या दृष्टीने चौथीपासूनच नवोदय परीक्षेची तयारी केली.

Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *