Aljapur sarpanch relief Commissioner suspends Solapur ZP CEO Manisha Avhale order

करमाळा (अशोक मुरूमकर) : तालुक्यातील आळजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच संजय रोडे यांना सलग सहा महिने मासिक बैठकीला गैरहजर राहिल्याच्या तक्रारींवर सोलापूर जिल्हा परिषदेच्या मुख्यकार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी अपात्र ठरवेल होते. मात्र त्या आदेशाविरुद्ध सरपंच रोडे यांनी पुणे येथील अतिरिक्त विभागीय आयुक्त यांच्याकडे अपील केले होते. त्यावर अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विदेवी यांनी आदेश देत पुढील सुनावणी होईपर्यंत आव्हाळे यांच्या आदेशाला स्थगिती दिली आहे.

आळजापूर ग्रामपंचायतीचे सरपंच रोडे हे सलग सहा महिनेपेक्षा जास्त दिवस ग्रामपंचायतीच्या मासिक बैठकीला गैरहजर राहिल्यामुळे त्यांना अपात्र करण्याची मागणी रविकांत घोडके यांनी केली होती. त्या तक्रारीवर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी आदेश देत रोडे यांना अपात्र ठरवले होते. सरपंच रोडे यांच्यासह ग्रामपंचायत सदस्य कलावती काळे, पार्वती रोडे व वत्सला काळे हे मासिक बैठकांना गैरहजर राहत असल्याची तक्रार घोडके यांनी केली होती. मुख्याधिकारी आव्हाळे यांनी आदेशात म्हटले होते की, पंचायतीच्या परवानगीशिवाय सलग सहा महिने अनुपस्थित असलेल्या सदस्याचे पद रद्द होते. घोडके यांनी केलेल्या तक्रारीनुसार कलावती काळे, वत्सला काळे व पार्वती रोडे यांचा जुलै २०२२ पासून डिसेंबर २०२२ या कालावधीत गैरहजर कालावधी हा १८० दिवसांपेक्षा कमी आहे. त्यामुळे त्या पात्र ठरत आहेत. मात्र संजय रोडे यांचा गैरहजर कालावधी १८० दिवसांपेक्षा जास्त आहे. त्यामुळे त्यांना अपात्र ठरवण्यात आले होते.

Discussion in the political circles on Mohite Patil entry into the Madha Lok Sabha constituency

रोडे हे २१ जून २०२२ ते १० फेब्रुवारी २०२३ या कालावधीत गैरहजर आहेत. सूचक किंवा अनुमोदक म्हणूनही त्यांचा उल्लेख नाही. त्यांचा गैरहजर कालावधी २०५ दिवस झाला. मासिक सभांना २५ दिवस अनुपस्थितीचा रोडे यांनी अर्ज केला होता. मात्र रजा मंजुरीचा अधिकार ग्रामपंचायतीस असून तसा ठराव होणे आवश्यक होते. ग्रामसेवक दत्तात्रय निकम यांच्या जबाबानुसार रोडे हे एका सभेच्या (पृष्ठ क्र. ६९) नोंदीनुसार उशिरा आले होते. त्यांनी रजिस्टर घेऊन खाडाखोड करत सही केली होती. दरम्यान रोडे यांनी संबंधित सही चुकून झाली असल्याचे स्पष्ट केले होते. या प्रकरणात रोडे यांना अपात्र ठरवण्यात आले होते. या आदेशाच्याविरुद्ध सरपंच रोडे यांनी अपील केले होते. त्यावर आज (बुधवारी) निकाल आला आहे.

अतिरिक्त विभागीय आयुक्त कविता द्विदेवी यांनी आदेशात म्हटले आहे की, पुढील सुनावणी होईपर्यंत म्हणजे १८ जुलै २०२४ पर्यंत आव्हाळे यांचा आदेश स्थगित करण्यात येत आहे. या आदेशाची प्रत सरपंच रोडे यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलला दिली आहे. यामध्ये ॲड. सुरज महामुनी, ॲड. धनश्री देवडकर, ॲड. शैलजा शिंदे व ॲड. अजित विघ्ने यांनी कायदेतज्ञ म्हणून काम पाहिले. आदिनाथ साखर कारखान्याचे माजी संचालक डॉ. हरिदास केवारे, पंचायत समितीचे माजी सदस्य, ॲड. मा राहुल सावंत, माजी सरपंच बीभीषण खरात, महादेव गायकवाड, रंगनाथ काळे, सुनील काळे, भाऊसाहेब रोडे, विष्णू काळे, तात्या काळे, आण्णा रोडे, श्री दत्ता रोडे, नवनाथ भालेराव, संतोष भालेराव, विलास काळे, अमोल घोडके, नवनाथ शेवाळे, राजेंद्र रोडे यांचे सहकार्य, कष्ट व नियोजन यामुळे हा न्याय मिळाला असल्याचे रोडे यांनी केले.

By kaysangtaa.21

पुणे, मुंबई, पिंपरी चिंचवड, सोलापूर व नगर येथे ‘पुढारी’, ‘प्रभात’ व ‘सकाळ’मध्ये बातमीदार व उपसंपादक म्हणून काम करत पत्रकारितेचा अनुभव घेतल्यानंतर 'काय सांगता' हे न्यूज पोर्टल सुरु करण्यात आले आहे. या पोर्टलवरील प्रत्येक बातमी विश्वसनीय असते. करमाळा येथील बातम्यांसाठी अशोक मुरूमकर संपर्क : ९९२३१७५०२४ कार्यालय पत्ता : डॉ. बाबासाहेब आंबेडकर शॉपिंग सेंटर, गाळा नं. ४७, पेट्रोल पंपाजवळ, जुनी भाजी मंडई, वरचा मजला करमाळा, जि. सोलापूर- ४१३२०३. मेल आयडी : kaysangtaa.21@gmail.com जाहिरातीसाठी संपर्क : ९९२३१७५०२४

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *