करमाळा (सोलापूर) : आमदार संजयमामा शिंदे यांनी जानेवारी 2023 मध्ये मतदारसंघात गावभेट दौरा करून नागरिकांच्या समस्या जाणून घेतल्या होत्या. त्यात त्यांनी कुस्करवाडी येथेही भेट दिली होती. तेव्हा कुस्करवाडी येथील नागरिकांनी रस्त्याचा प्रश्न मांडला होता. त्यावर पाठपुरावा करून आमदार शिंदे यांनी रस्त्याला निधी उपलब्ध करून घेतला आहे.
अनेकवेळा निवेदने निवेदने देऊनही काम होत नसल्याने नागरिकांनी निवडणूकीवर बहिष्कार टाकला होता. कुस्करवाडीची लोकसंख्या कमी असल्याने पंतप्रधान अथवा मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेची अंमलबजावणी येथे होत नव्हती. त्यावर आमदार शिंदे यांनी खासबाब म्हणून बांधकाम विभागास शिफारस केली होती. त्यावर सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपकार्यकारी अभियंता के. एम. उबाळे साहेब यांनी तातडीने सर्वे करून तांत्रिक मंजुरी घेत कार्यवाही केली. या रस्त्याला २ कोट निधी मंजूर झाला आहे. या निधीतून या रस्त्यावर मुरूमीकरण, खडीकरण, मजबूतीकरण, कच्च्ये गटर्स, मुरुम बाजूपट्टी, डांबरीकरण होणार आहे. लोकसभेची आचारसंहिता संपल्यानंतर कार्यारंभ आदेश निघून कामास सुरुवात होईल. ही बातमी कळताच, कुस्करवाडी व या रस्त्यावर राहणाऱ्या नागरिकांनी आनंद व्यक्त करून “मामा है तो मुमकीन है!” अशी भावना व्यक्त केली आहे.