Loksbha election करमाळ्यात सोमवारपासून महायुतीच्या सभांचा धडाका! संपुर्ण तालुक्यात ‘असे’ असणार नियोजन

Mahayuti meetings in Karmala from Monday There will be planning in the entire taluk

करमाळा (अशोक मुरूमकर) : माढा लोकसभा मतदारसंघाचे महायुतीचे उमेदवार खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रचारासाठी सोमवारपासून (ता. २२) सभांचा धडाका सुरु होणार आहे. आमदार संजयमामा शिंदे व भाजपचे खासदार निंबाळकर यांच्या उपस्थितीत सभांचे व रॅलीचे नियोजन करण्यात आले आहे. सावडी येथून या सभांची सुरुवात होणार आहे, अशी माहिती आमदार शिंदे यांचे समर्थक सुजित बागल यांनी ‘काय सांगता’ न्यूज पोर्टलला दिली आहे.

बागल म्हणाले, ‘महायुतीमधील भाजपसह राष्ट्रवादी (अजित पवार), शिवसेना (शिंदे गट), रासप, आरपीआय (ए), रयत क्रांती यांच्यासह सर्व मित्र पक्षाचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीत करमाळा तालुक्यात खासदार निंबाळकर यांच्या प्रचारार्थ जोरदार सभा व रॅली होणार आहे. दरम्यान करमाळा शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांना अभिवादन केले जाणार आहे. सोमवारी सावडी येथील नवीन मंगल कार्यालय येथे सकाळी ९ ते १२ या वेळेत सभा होणार आहे. यावेळी कोर्टी व केत्तूर गणातील गावांमधील नागरिक उपस्थित राहणार आहेत. दुपारी २ ते ५ यावेळेत करमाळा येथील विकी मंगल कार्यालयात होणाऱ्या सभेला करमाळा शहरासह पांडे, रावगाव व वीट गणातील गावातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर सायंकाळी ६ ते १० यावेळेत बाईक रॅली निघणार आहे.’

मंगळवारी (ता. २३) सकाळी ९ ते १२ या वेळेत कंदर येथील साई कृपा मंगल कार्यालय येथे सभा होणार आहे. यावेळी केम व वांगी गणातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. त्यानंतर २ ते ५ या वेळेत साडे येथील कोटीलिंग मंगल कार्यालय येथे सभा होणार आहे. साडे व कुंभेज गणातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. सायंकाळी ६ ते ९ यावेळेत चिखलठाण येथील श्रीनाथ मंगल कार्यालय येथे सभा होणार असून जेऊर व चिखलठाण भागातील नागरिक उपस्थित राहणार आहेत. या सभांसाठी जगताप, चिवटे व बागल गटासह शिंदे गटाचे कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत. भाजप, राष्ट्रवादी व मित्र पक्षाचे सर्व पदाधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत, असे बागल यांनी सांगितले आहे.
निंबाळकरांच्या प्रचारासाठी करमाळ्यात ‘व्हिडीओ व्हॅन’! आमदार शिंदेच्या हस्ते प्रचाराची सुरुवात
मोहिते पाटील समर्थकांकडून व्यक्तिगत भेटींवर भर, महाविकास आघाडीतील प्रमुखांनी सक्रीय होण्याची गरज
शिवसेना तालुकाप्रमुखपदी राहुल कानगुडे यांची नियुक्ती
Madha Loksabha election : करमाळ्यात आमदार शिंदे यांच्या संपर्क कार्यालयात सोमवारी होणार जिल्हा परिषदेच्या गटनिहाय बैठका

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *