करमाळा (सोलापूर) : तालुक्यातील वडगाव विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या अध्यक्षपदी सदरदिन पठाण यांची बिनविरोध निवड झाली आहे. या निवडीनंतर श्री मकाई सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष दिनेश भांडवलकर यांनी त्यांचा सत्कार केला आहे. यावेळी नूतन संचालक जालिंदर रोडगे, सतीश अनपट, गोरख थोरात, गोरख कदम, पांडुरंग भांडवलकर, गणेश अंधारे, गोरख जगदाळे, अशोक शिंदे, इब्राहिम पठाण, सुनील मुसळे व अशोक रोडगे हे उपस्थित होते.
ग्रामपंचायत सदस्य अजित जाधव, संभाजी भांडवलकर, चंद्रकांत काळे, विजय रोडगे, विजय थोरात, रमेश जोशी, वामन रोडगे, माजी अध्यक्ष हेमंत रोडगे, बशीर शेख, महबूब शेख, रमजान पठाण, पप्पू पठाण, शाहरुख पठाण, अफजल पठाण, शिवशंकर जगदाळे, मोहन जगदाळे, संदीप जगदाळे, आबा जगदाळे, शहाजी रोडगे, सचिव भैरू कदम व शरद वाडेकर हे उपस्थित होते. नूतन अध्यक्ष व संचालकांचे बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल, कारखान्याचे माजी अध्यक्ष दिग्विजय बागल, सहाय्यक निबंध बेदाडे व सतीश अनपट यांनी अभिनंदन केले.